‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मधील कीर्ती सेटवर फावल्या वेळेत जोपासते हा छंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 04:18 PM2023-07-29T16:18:46+5:302023-07-29T16:22:55+5:30
. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलेच गुंतवून ठेवलं आहे.
‘झी टीव्ही’ वाहिनीवरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या प्रेमकथेचे कथानक आजच्या काळातील वृंदावनमध्ये घडते. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलेच गुंतवून ठेवले असून त्यातील मोहन (शब्बीर अहलुवालिया), राधा (निहारिका रॉय) आणि दामिनी (संभाबना मोहन्ती) यासारख्या वास्तववादी व्यक्तिरेखांमुळे मालिकेबद्दलची उत्कंठा कायम राहिली आहे. अलिकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की मोहनने त्याला राधाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा स्वीकार केला आहे आणि तो आपल्या भावना तिच्यासमोर लवकरच व्यक्त करण्यास तयार झाला आहे. मात्र मोहनची दिवंगत पत्नी तुलसीच्या (कीर्ती नागपुरे) खुनाच्या आरोपाखाली दामिनी राधाला अटक करायला लावून आपला हेतू यशस्वी करते.
सेटवर सतत चित्रीकरण सुरू असले, तरी अधूनमधून कलाकारांना मोकळा वेळ मिळतो आणि तेव्हा ते आपले छंद जोपासतात. लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती नागपुरेला वाचनाची आणि चित्रकलेची खूप आवड आहे. त्यामुळे ती घरी आणि सेटवरही आपल्या या दोन्ही छंदांना जोपासण्यासाठी वेळ काढते. सेटवर ती चित्रीकरणात व्यग्र असली, मध्ये मिळणाऱ्या ब्रेकमध्ये ती आपली वाचनाची आवड जोपासते. तर तिने आपल्या मेक-अप रूमचे रुपांतर आपल्या चित्रकलेच्या स्टुडिओत केले आहे. अशा प्रकारे चार भिंतींच्या आत आणि बाहेरही मनाला विरंगुळा देणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. वैयक्तिक छंदांचे महत्त्व कीर्तीला निश्चितच ठाऊक आहे.
कीर्ती नागपुरे म्हणाली, “बरीच वर्षं चित्र रंगवणं ही माझी गुप्त आवड होती. मालिकेच्या चित्रीकरणाच्या प्रदीर्घ वेळापत्रकामध्येही मी माझ्या मेक-अप रूममध्ये चित्र रंगवण्यासाठी थोडा वेळ जरूर काढते. या सततच्या कामाच्या रगाड्यात मला हे मोकळे क्षण मिळतात आणि त्यामुळे माझ्या मनाला शांतता आणि ताजेपणा मिळतो. चित्र रंगवण्याचा छंद हा नक्कीच उपाय आहे आणि त्यामुळे माझ्या मनाला शांतता लाभते.”