'इस प्यार को क्या नाम दूं' फेम अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचं निधन, टीव्ही इंडस्ट्रीवर पसरली शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 14:45 IST2020-08-26T14:39:42+5:302020-08-26T14:45:56+5:30
डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले.

'इस प्यार को क्या नाम दूं' फेम अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचं निधन, टीव्ही इंडस्ट्रीवर पसरली शोककळा
छोट्या पडद्यावरुन एक दु:खद बातमी आली आहे. अनेक प्रसिद्ध मालिकेमध्ये काम करणाऱ्या संगीता श्रीवास्तव यांचं 25 ऑगस्टला निधन झाले आहे. त्यांनी 'इस प्यार को क्या नाम दूं', 'थपकी प्यार की' आणि 'भंवर' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. रिपोर्टनुसार गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या, मुंबईतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्या दाखल होत्या. संगीता श्रीवास्तव यांना रक्तवहिन्यासंबंधीचा आजार होता. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. हॉस्पिटलमध्येच संगीता यांनी शेवटचा श्वास घेतला.
2020 हे वर्षे टीव्ही इंडस्ट्रिसाठी शापच ठरले आहे. आतापर्यंत अनेक टीव्ही सेलिब्रेटींचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी 'इस प्यार को क्या नाम दू? एक बार फिर' फेम समीर शर्मा घरात मृत अवस्थेत आढळला. 44 समीर किचनमधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर डिप्रेशनवर एक नोट लिहिलेली होती. समीरची ही इंस्टाग्राम पोस्ट जोरदार व्हायरल झाली होती.