ए. आर. रेहमानने दिला अरमान मलिकला सुखद आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 04:44 PM2019-01-30T16:44:34+5:302019-01-30T16:45:34+5:30

‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात सुपरगुरू म्हणून काम पाहणारे महान संगीतकार ए. आर. रेहमान यांनी यातील प्रशिक्षक अरमान मलिक याला एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला.

A. R. Rehman gave Armaan Malik a pleasant surprise push | ए. आर. रेहमानने दिला अरमान मलिकला सुखद आश्चर्याचा धक्का

ए. आर. रेहमानने दिला अरमान मलिकला सुखद आश्चर्याचा धक्का

googlenewsNext
ठळक मुद्देसंगीतकार ए. आर. रेहमान यांनी प्रशिक्षक अरमान मलिक याला दिला सुखद आश्चर्याचा धक्का


स्टार प्लसवरील बहुप्रतीक्षित ‘द व्हॉइस’ या आगामी कार्यक्रमाच्या प्रसारणाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. या कार्यक्रमात सुपरगुरू म्हणून काम पाहणारे महान संगीतकार ए. आर. रेहमान यांनी यातील प्रशिक्षक अरमान मलिक याला एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी लोकप्रिय संगीतकार आणि गायक डब्बू मलिकला या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. 

डब्बू मलिक हे अरमानचे वडील आहेत. यावेळी डब्बू मलिकने ‘थोडासा प्यार हुआ है’ हे गाणे सादर करून प्रशिक्षक आणि प्रेक्षकांना प्रभावित केले. यानंतर
त्यांनी आपल्याला या कार्यक्रमात बोलावून ए. आर. रेहमानसमोर आपले गाणे सादर करण्याची संधी दिल्याबद्दल आपला मुलगा आणि या कार्यक्रमातील एक प्रशिक्षक अरमानचे आभार मानले. आपल्याला तुझा अभिमान वाटतो, असे त्यांनी अरमानला संगितल्यावर वातावरण काहीसे भावनावश झाले. आपल्या वडिलांना खुश झाल्याचे पाहून अरमानचे डोळे पाणावले. डब्बू मलिकच्या गाण्याने रेहमानही प्रभावित झाला होता. त्याने सांगितले, “मी डब्बूच्या आवाजाच्या प्रेमात पडलो असून त्याने जेव्हा ‘थोडा सा प्यार हुआ है’ हे गाणे गायले, तेव्हा मंत्रमुग्ध होऊन मी ते ऐकतच राहिलो.”
आता ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाच्या प्रसारणाची प्रतीक्षा जवळपास संपुष्टात आली असून त्यात लवकरच भारताच्या नव्या गायकाचा शोध घेतला जाईल. ३ फेब्रुवारी २०१९ पासून शनिवार-रविवारी रात्री ८ वाजता पाहा ‘द व्हॉइस’ फक्त ‘स्टार प्लस’वर पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: A. R. Rehman gave Armaan Malik a pleasant surprise push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.