विघ्नहर्ता गणेशसाठी पारस छाब्राला दररोज परिधान करावा लागतो इतक्या किलो वजनाचा मुकुट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 19:46 IST2019-04-22T19:44:39+5:302019-04-22T19:46:44+5:30
‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत रावणाची भूमिका साकारण्यासाठी पारसची निवड करण्यात आल्यामुळे तो प्रचंड खुश आहे.

विघ्नहर्ता गणेशसाठी पारस छाब्राला दररोज परिधान करावा लागतो इतक्या किलो वजनाचा मुकुट
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘विघ्नहर्ता गणेश’ ही पौराणिक मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत नुकताच एका पात्राचा प्रवेश झाला आहे. पारस छाब्राने अनेक वर्षं मॉडलिंग क्षेत्रात काम केले असून त्याला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. पारसची या मालिकेत एंट्री झाली असून या मालिकेत तो रावणाची दमदार भूमिका साकारत आहे. या मालिकेत आता एक रोचक वळण येणार आहे आणि त्यात भगवान शिवाच्या 19 अवतारांच्या कथा प्रेक्षकांना सांगितल्या जाणार आहेत. या कथा रावण गणेशाला सांगणार आहे.
‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत रावणाची भूमिका साकारण्यासाठी पारसची निवड करण्यात आल्यामुळे तो प्रचंड खुश आहे. या मालिकेतील त्याचा लुक खूपच वेगळा असणार आहे. या लुकवर मालिकेच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. रावणाच्या आभुषणापासून ते मेकअपपर्यंत सगळ्याच गोष्टीतून या व्यक्तिरेखेचे वैभव आणि अस्सलपणा उघड होणार आहे. या संपूर्ण मालिकेत रावण शिरावर जो मुकुट घालणार आहे, त्याचे वजनच 12 किलो आहे. या मालिकेसाठी हा मुकूट खास बनवण्यात आलेला आहे. या भूमिकेविषयी पारस छाब्राला विचारले असता त्याने सांगितले की, “सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील विघ्नहर्ता गणेश या मालिकेत रावणाची भूमिका साकारण्यास मी अतिशय उत्सुक आहे. या व्यक्तिरेखेच्या वेशात येण्यासाठी मला तासन् तास लागतात. पण एकदा मी वेश परिधान करून संपूर्ण तयार झालो की, मग मला माझ्या सामर्थ्याची आणि अधिकारांची जाणीव होऊ लागते, जे मला या व्यक्तिरेखेतून मिळतात आणि मी जे 12 किलो वजन बाळगतो ते वेगळेच. माझा मुकुट 12 किलो वजनाचा आहे आणि तो दररोज शूटिंग दरम्यान पेलणे हे एक आव्हानच आहे. मी स्वतः एक शिवभक्त आहे आणि शिवाच्या सर्वात मोठ्या भक्ताची भूमिका साकारायला मला मिळतेय याचा मला अपार आनंद होत आहे.”
विघ्नहर्ता गणेश ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 7.15 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळते.