‘ही’ गायिका आहे ‘ओsss शेठ’ फेम उमेश गवळींची बहिण; जाणून घ्या कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 05:46 PM2021-09-05T17:46:14+5:302021-09-05T17:51:48+5:30

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला वेडं लावलं. अगदी तरूणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही.

radha khude is sister of t O Sheth fame singer Umesh Gawali | ‘ही’ गायिका आहे ‘ओsss शेठ’ फेम उमेश गवळींची बहिण; जाणून घ्या कोण?

‘ही’ गायिका आहे ‘ओsss शेठ’ फेम उमेश गवळींची बहिण; जाणून घ्या कोण?

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘ओ शेठ’ या गाण्यानं उमेश गवळी हे नाव अगदी घराघरांत पोहोचलं. उमेश आधी किबोर्डिस्ट म्हणून ऑर्केस्ट्रात काम करायचा.

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ (Oshet Tumhi Nadach Kelay Thet Marathi Song) या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला वेडं लावलं. अगदी तरूणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. अगदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या गाण्यानं भुरळ घातली.  सोशल मीडियावर तर हे गाणं तुफान गाजलं. गाण्यावरच्या मजेशीर भन्नाट मीम्सनीही लोकांचं मनोरंजन केलं. हे भन्नाट गाणं गायक उमेश गवळी (Umesh Gawali ) यांनी गायलं आहे. मात्र आज आम्ही उमेश गवळींबद्दल नाही तर त्यांच्या बहिणीबद्दल सांगणार आहोत. होय, उमेश गवळींची बहिण ही सुद्धा एक मोठी गायिका आहे. तिचं नाव राधा खुडे. कलर्स मराठीवरच्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात पाच हजार स्पर्धकांमधून निवडली गेलेली आणि आपल्या आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी राधा खुडे उमेश गवळींची बहिण आहे. अर्थात मानलेली.

‘सुर नवा नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेल्या राधाने अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमधून आपले करियर केले आहे. राधा खुडे ही मुंबईतील वालचंद नगर जवळील शिवाजीनगरात राहते. राधा खुडे हिच्या आईचे भाजीपाला व फळ विक्रीचे दुकान आहे. त्या भाजीपाला विकून शिलाई कामही करतात. तर वडील दत्तू खुडे हे छोटा-मोठा व्यवसाय करून आपल्या आर्थिक मदत करतात.

राधाने सुर नवा ध्यास नवा मध्ये येळकोट येळकोट, चांदणं चांदणं झाली रात बाई, माझ्या दुधात नाही पाणी, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, जीव झाला येडा पिसा हे आणि इतर गाणी म्हणून तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.  
  उमेश गवळी आणि राधा हे सख्खे भाऊ-बहीण नाहीत. पण राधा उमेशला भाऊ मानते. अलीकडेच या दोघांची भेट झाली होती. राधाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.  

 ‘ओ शेठ’ या गाण्यानं उमेश गवळी हे नाव अगदी घराघरांत पोहोचलं. उमेश आधी किबोर्डिस्ट म्हणून ऑर्केस्ट्रात काम करायचा. पण संगीताची उर्मी त्याला स्वस्थ बसू द्यायची नाही. त्यानं स्वत:चा रेकॉर्डिंग स्टुडिओ काढला. हे काम सुरू असताना त्याला उस्मानाबादच्या एका मित्राचा फोन आला आणि त्याने उमेशला गाण्याच्या दोन ओळी ऐकवल्या. आधी तर उमेशनं कामाच्या व्यापाकडे या गाण्याकडं दुर्लक्ष केल. पण मित्राच्या तगाद्यामुळे त्यानं हे गाणं बनवलं आणि हे गाणं सुपरहिट झालं.


 

Web Title: radha khude is sister of t O Sheth fame singer Umesh Gawali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.