राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील माधुरी म्हणजेच कविता लाडने शेअर केली त्यांच्या नवऱ्याविषयी काही गुपिते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 04:58 AM2017-12-19T04:58:10+5:302017-12-19T10:28:10+5:30
नवरा असावा तर असा हा आगळावेगळा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्स मराठी या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवघ्या ...
न रा असावा तर असा हा आगळावेगळा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्स मराठी या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हर्षदा खानविलकर करणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि स्वरूप काय असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये बरीच उत्सुकता होती. आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या नवऱ्याला या खेळात भाग घ्यावा लागणार आहे. नवरा खेळणार आणि बायको जिंकणार असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. प्रत्येक स्त्रीसाठी नवरा म्हणजे जोडीदार, सखा आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा संसाराचा आधारस्तंभ असतो. कलर्स मराठीवरील काही लोकप्रिय कलाकार देखील म्हणत आहेत नवरा असावा तर असा. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमधील माधुरी म्हणजेच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री कविता लाड तसेच ‘तू माझा सांगाती मालिके’मधील आवली म्हणजे ऋजुता देशमुख तसेच सोनाली खरे, अलका कुबल देखील असंच काहीसे म्हणत आहेत.
‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमधील माधुरी म्हणजेच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री कविता लाडने तिचे काही वैयक्तिक अनुभव शेअर केले. ती सांगते, “लग्नानंतर दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसे एकत्र येतात. माझी लाइफस्टाईल अशी होती की, सगळे वेळेत करायचे, पण नवरा जाहिरात क्षेत्रामधला असल्याने त्याची लाइफस्टाईल ही खूपच वेगळी होती. त्याला मला कधीकधी घेऊन पार्टीला जायचे असायचं आणि मी माझ्या शुटिंगच्या व्यग्र शेड्युलमुळे चित्रीकरणाला जाऊ शकत नसे. मुलगा झाल्यानंतर देखील मी प्रायोगिक नाटकांमध्ये कामं करत होते, तेव्हा विंगमध्ये माझा नवरा छोट्याशा बाळाला घेऊन उभा राहायचा. त्याला खेळवायचा, तू काम कर, मी सांभाळतो बाळाला असं म्हणायचा. माझ्या आयुष्यात हे जे क्षण येत गेले त्या प्रत्येक क्षणी मला वाटले की, नवरा असावा तर असा.
‘तू माझा सांगाती’ मालिकेत आवलीची भूमिका साकारणारी ऋजुता देशमुख सांगते, नवरा बायकोमधील भांडणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. आमच्यात पण होतात. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझा नवरा माझे खूप लाड करतो. माझे खूप हेक्टिक शेड्युल असेल तर मला सेटवरून घ्यायला येतो. माझ्यासाठी घरामधली छोटी–मोठी कामं करतो. हे मला कुठे तरी खूपच महत्वाचे वाटते. या गोष्टींमुळे मला पण वाटतं नवरा असावा तर असा.
Also Read : 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेच्या शीर्षक गीत सोशल मीडियावर हिट!