​गोठ मालिकेतील राधाचे फायटिंग स्पिरिट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2017 09:48 AM2017-07-06T09:48:10+5:302017-07-06T15:18:10+5:30

स्टार प्रवाहच्या 'गोठ' मालिकेतली राधा अडचणींना खंबीरपणे सामोरी जाणारी आहे. लग्नानंतर म्हापसेकरांच्या घरी गेल्यानंतरही तिला अनेक अडचणींचा सामना करावा ...

Radha's fitting spirit in the frost series | ​गोठ मालिकेतील राधाचे फायटिंग स्पिरिट

​गोठ मालिकेतील राधाचे फायटिंग स्पिरिट

googlenewsNext
टार प्रवाहच्या 'गोठ' मालिकेतली राधा अडचणींना खंबीरपणे सामोरी जाणारी आहे. लग्नानंतर म्हापसेकरांच्या घरी गेल्यानंतरही तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, तिने हिंमत न हारता परिस्थितीला सामोरी गेली. त्याचाच परिणाम म्हणून राधा आणि विलास आता पती-पत्नी म्हणून जवळ आले आहेत. त्याचे नाते आता फुलू लागले आहे. अशीच एक घटना राधाची भूमिका साकारणाऱ्या रुपल नंदला अनुभवायला मिळाली. चित्रीकरण संपवून दुजाकीवरून घरी जात असताना तिचा अपघात झाला. तिच्या उजव्या हाताला आणि पायाला जबर लागले. पायातून कळा येत होत्या. तिला नीट उभेही राहाता येत नव्हते. मात्र, रुपल स्वत: फिजिओथेरपिस्ट असल्याने तिने या परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. न घाबरता ती तशीच गाडी चालवत घरी गेली. उजव्या पायाचा स्नायू दुखावला असल्याचे तिच्या लक्षात आले. 
दुसऱ्या दिवशी मालिकेचे चित्रीकरण ठरलेले होते. तिच्या न जाण्याने चित्रीकरण रद्द करावे लागले असते. त्यामुळे स्वत:चे थोडेफार उपचार करून ती पुन्हा चित्रीकरणाला उपस्थित राहिली. रुपल सेटवर आल्यावर सर्वांना झालेला प्रकार कळला. तिच्या या खंबीर वागण्याचे सर्वांनीच कौतुक केले.
कलाकारासाठी त्याचा अभिनय हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तो ज्या कार्यक्रमाचा, चित्रपटाचा भाग आहे. तो त्यांच्यासाठी खूप खास असतो. रुपल नंद या अभिनेत्रीला गोठ या मालिकेने खरी ओळख मिळवून दिली. आज तिला प्रेक्षक राधा म्हणूनच ओळखत आहेत. त्यामुळे या मालिकेसाठी तिने शो मस्ट गो ऑन ही एकच गोष्ट डोळ्यांसमोर ठेवली. यातूनच तिचे फायटिंग स्पिरिट दिसून आले. 

Also Read : गोठ फेम सुप्रिया विनोद यांनी काढले हेअर ड्रेसर आणि रूपल नंदचे स्केच
 

Web Title: Radha's fitting spirit in the frost series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.