कृष्णा चली लंडनच्या गौरव सरीन आणि मेघा चक्रवर्तीला मिळाली ही संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 07:15 AM2018-12-31T07:15:00+5:302018-12-31T07:15:02+5:30
स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंडन’मध्ये सध्या रोमान्सचे वारे वाहत आहेत. ऑनस्क्रीन जोडी राधे (गौरव सरीन) आणि कृष्णा (मेघा चक्रवर्ती) हे लंडनमध्ये असून ते एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत आहेत.
‘कृष्णा चली लंडन’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेमध्ये राधे या मुलाची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. या मालिकेची कथा ही आजच्या इतर मालिकांपेक्षा वेगळी असल्याने ती प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे.
स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंडन’मध्ये सध्या रोमान्सचे वारे वाहत आहेत. ऑनस्क्रीन जोडी राधे (गौरव सरीन) आणि कृष्णा (मेघा चक्रवर्ती) हे लंडनमध्ये असून ते एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत आहेत. या मालिकेत ते दोघे ‘झिरो’ चित्रपटातील मेरा नाम तू या गाण्याची पुनर्निर्मिती करताना पाहायला मिळणार आहेत. याविषयी मेघा सांगते, “मी बॉलीवूड बादशाहा शाहरुख खानची मोठी चाहती आहे. ‘मेरा नाम तू’ या गीताची मला पडद्यावर पुनर्निमिती करायला मिळणार आहे हे कळल्यावर मी खूपच खूश झाले होते. या शोमध्ये राधे आणि कृष्णा हे लंडन शहरात असून शहरात ते गर्दी असलेल्या रस्त्यावर अचानक डान्स करू लागतात असे एक दृश्य आहे. गौरव आणि माझ्यासाठी हा छान अनुभव होता. कारण सध्या ख्रिसमसमुळे लंडन खूपच सुंदर दिसत आहे आणि किंग खानच्या नवीन गाण्यावर परफॉर्म करण्याची बातच काही और आहे.”
याविषयी गौरव सांगतो, “राधे आणि कृष्णा हे लंडनमध्ये मजामस्ती करत असून शहरात धमाल करत आहेत. त्यांच्यातील रोमँटिक दृश्यं चित्रीत करण्याचा अनुभव खूपच छान होता. ते लंडनमधील काही सुंदर ठिकाणी या चार्टबस्टर गाण्यावर नाचताना दिसणार आहेत. आमचे हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे.”
‘कृष्णा चली लंडन’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना स्टारप्लसवर पाहायला मिळते.