प्रसिद्ध रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला, कोण आहे बायको? लग्नातील पहिला फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:51 IST2025-01-31T09:50:54+5:302025-01-31T09:51:04+5:30

एमीवे बंटाईनंतर लोकप्रिय रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे.

Raftaar Marries Manraj Jawanda 5 Years After Divorce With Komal Vohra See First Photo Of Couple | प्रसिद्ध रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला, कोण आहे बायको? लग्नातील पहिला फोटो समोर

प्रसिद्ध रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला, कोण आहे बायको? लग्नातील पहिला फोटो समोर

Raftaar: सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. अलिकडेच प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाई लग्नबंधनात अडकला होता. आता एमीवे बंटाईनंतर लोकप्रिय रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. रफ्तारच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. 

रफ्तारनं गर्लफ्रेंड मनराजसोबत (Raftaar Marries Manraj Jawanda ) नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. मात्र दोघांनीही लग्नाची भनक कोणालाही लागू न देता गुपचूप लग्न उरकले. नवीन वर्षात रफ्तारच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रफ्तारनं आणि मनराजवर शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे. 

मनराज ही एक फॅशन स्टायलिस्ट आहे. यासोबतच ती एक अभिनेत्री देखील आहे. दरम्यान, रफ्तारने लग्नाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच फोटोही शेअर केलेले नाहीत. पण, सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो, आणि पत्रिकाही व्हायरल झाली. ज्यावर दिलिन आणि मनराजच्या लग्नसोहळ्यात आपलं स्वागत आहे, असं लिहलेलं दिसून आलं. तसेच प्री वेडिंग फंक्शनचे व्हिडीओही व्हायरल झालेत. ज्यात रफ्तार हा मनराजसोबत नाचताना दिसतोय. 

रॅपर रफ्तारचे खरे नाव दिलीन नायर असं आहे. त्याचं हे दुसरं लग्न आहे. डिसेंबर २०१६ मध्ये रफ्तारने कोमल वोहरा हिच्याशी पहिलं लग्न केलं होतं. पण, त्यांचं नात जास्त काळ टिकलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, रफ्तार आणि कोमल यांनी २०२० मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मात्र, कोविड काळात त्यांचा घटस्फोटाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२२ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली.

 रफ्तार हा लोकप्रिय रॅपर असून त्यानं करिअरची सुरुवात एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. तसंच त्याने अनेक रॅपसॉन्सही तयार केले. तसंच 'रोडिज' आणि 'डान्स इंडिया डान्स ७' च्या परीक्षक पदाची भूमिकाही पार पाडली आहे.  आतापर्यंत त्याने अनेक हीट गाणी दिली आहे. 

Web Title: Raftaar Marries Manraj Jawanda 5 Years After Divorce With Komal Vohra See First Photo Of Couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.