तीन नाही चार लग्नं! गहना वशिष्ठने राहुल महाजनबद्दल केला धक्कादायक खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 05:55 PM2020-12-07T17:55:50+5:302020-12-07T17:56:28+5:30

‘बिग बॉस’मधील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक असलेला राहुल महाजनने याच शोच्या 14 व्या सीझनमध्ये चॅलेंजच्या रूपात एन्ट्री घेतली आहे. राहुलचे पर्सनल लाइफ तेव्हाही फार चर्चेत होते आणि आताही आहे.

Rahul Mahajan Has Been Married Not Thrice, But 4 Times, Claims Controversy Queen Gehana Vasisth |  तीन नाही चार लग्नं! गहना वशिष्ठने राहुल महाजनबद्दल केला धक्कादायक खुलासा!!

 तीन नाही चार लग्नं! गहना वशिष्ठने राहुल महाजनबद्दल केला धक्कादायक खुलासा!!

googlenewsNext
ठळक मुद्देगहनाने दिलेल्या माहितीनुसार, राहुलने डॉलीसोबत ठाण्याच्या एका मंदिरात लग्न केले होते. मात्र हे लग्न सीक्रेट ठेवले गेले.

‘बिग बॉस’मधील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक असलेला राहुल महाजनने याच शोच्या 14 व्या सीझनमध्ये चॅलेंजच्या रूपात एन्ट्री घेतली आहे. राहुलचे पर्सनल लाइफ तेव्हाही फार चर्चेत होते आणि आताही आहे. आता तर राहुलच्या पर्सनल लाईफबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येतेय. होय, आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिने राहुलबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. राहुलने तीन नाही तर चार लग्ने केलीत, असा दावा तिने केला आहे. तिच्या या खुलाशाने सगळेच हैराण झाले आहेत.

राहुलने 218 साली, कजाकिस्तानची मॉडेल  नतालिया इलिनासोबत तिसरे लग्न केले होते.  ती रशियन आहे पण तिने आता हिंदू धर्मा स्वीकारला आहे.    

दरम्यान, राहुलने पहिले लग्न त्याची बालपणीची मैत्रीण श्वेता सिंहसोबत केले होते. 2006 मध्ये हे लग्न झाले होते. पण ते फार काळ टिकले नाही.

2010 साली त्याने डिंम्पी गांगुलीसोबत लग्नगाठ बांधली होती.  पण तीन वर्षातच ते वेगळे झाले.  श्वेता व डिंम्पी दोघांनीही राहुलवर मारहाण व मानसिक छळाचा आरोप केला होता. 2018 मध्ये राहुलने नतालियासोबत लग्न केले. पण गहना वशिष्ठ मानाल तर, राहुलचे आणखी एक लग्न झाले आहे. 
बॉलिवूड लाईफने याबाबतचे वृत्त दिले आहे. गहनाच्या दाव्यानुसार, राहुलने मुंबईत राहणारी मॉडेल भाविषा ‘डॉली’ देसाईसोबत लग्न केले आहे. ती गोव्याची आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहत आहे. लग्नानंतर काही महिन्यात राहुलने डॉली देसाईला सोडले आणि आता दोघेही एकमेकांच्या संपर्कात नाहीत.
गहनाने दिलेल्या माहितीनुसार, राहुलने डॉलीसोबत ठाण्याच्या एका मंदिरात लग्न केले होते. मात्र हे लग्न सीक्रेट ठेवले गेले.
राहुलकडून अद्याप याबद्दल काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. 
  
 

Web Title: Rahul Mahajan Has Been Married Not Thrice, But 4 Times, Claims Controversy Queen Gehana Vasisth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.