बापमाणूस! राहुल वैद्य होणार बाबा; सोनोग्राफी व्हिडीओ पोस्ट करत दाखवली बाळाची पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 12:09 IST2023-05-19T12:08:54+5:302023-05-19T12:09:43+5:30
Rahul vaidya: राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर पत्नी दिशा परमारसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी ते आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं आहे.

बापमाणूस! राहुल वैद्य होणार बाबा; सोनोग्राफी व्हिडीओ पोस्ट करत दाखवली बाळाची पहिली झलक
'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या प्रसिद्ध गायक म्हणजे राहुल वैद्य (Rahul Vaidya). उत्तम गायन करणाऱ्या राहुलने अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावलं आहे. २०१६ मध्ये त्याने एका इंडो बांग्लादेशी सिनेमात काम केलं होतं. राहुल आज लोकप्रिय सेलिब्रिटी असून सोशल मीडियावर कायम त्याची चर्चा रंगत असते. काही काळापूर्वीच अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्न केलेल्या राहुलने नुकतीच एक गुडन्यूज शेअर केली आहे. राहुल लवकरच बाबा होणार आहे.
राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर पत्नी दिशा परमारसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी ते आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं आहे. सोबतच त्यांनी एक सोनोग्राफीचा फोटो आणि व्हिडीओही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिशाचं बेबीबंप दिसत आहे.
या फोटोच्या माध्यमातून राहुल आणि दिशा यांनी त्यांच्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे. “लवकरच होणारे आई-बाबा आणि बाळाकडून तुम्हाला नमस्कार”, असं कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, राहुल आणि दिशा यांनी १६ जुलै २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. बिग बॉस १४ हा शो सुरु असताना राहुलने दिशाला प्रपोज केलं.