राहुल वैद्य आणि दिशा परमार लवकरच अडकणार लग्नबेडीत, वर-वधूच्या गेटअपमधील फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 12:56 IST2021-07-16T12:55:53+5:302021-07-16T12:56:21+5:30
बिग बॉस फेम आणि गायक राहुल वैद्य लवकरच अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्नबेडीत अडकणार आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमार लवकरच अडकणार लग्नबेडीत, वर-वधूच्या गेटअपमधील फोटो आले समोर
बिग बॉस फेम आणि गायक राहुल वैद्य लवकरच अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. दिशा आणि राहुलचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नुकतेच दिशा परमारचा आणि राहुल वैद्यचा वधू वराच्या गेटअपमधील फोटो समोर आले आहेत.
दिशा परमार आणि राहुल वैद्यचे लग्न मुंबईतील हॉटेल हयातमध्ये लग्न पार पडणार आहे. काल रात्रीच दिशा परमार आणि राहुल वैद्यची फॅमिली तिथेच पोहचले होते. आता दिशा परमारचे मेकअप आर्टिस्ट तिच्याकडे पोहचले असून तिचे मेकअप रुममधील फोटो लीक झाले आहेत.दिशा खूप आनंदी दिसत असून तिच्या चेहऱ्यावर ग्लोदेखील पहायला मिळतो आहे. विकास गुप्ता दिशा परमारचा खूप चांगला मित्र आहे. काल रात्री तो हॉटेलमध्ये दाखल झाला आहे.
राहुल वैद्य लग्नाच्या निमित्ताने दिशा परमारला स्पेशल गिफ्ट देणार आहे. आज दोघांच्या लग्नाचे गाणे लाँच होणार आहे. हे गाणे राहुल वैद्यच्या स्वरसाजात सजलेले आहे. या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
याशिवाय दिशा परमारच्या बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, मेहंदी कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत.
तसेच राहुल वैद्यच्या हळदी सेरेमनीचा व्हिडीओदेखील राहुल वैद्यने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
राहुल वैद्यने दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टेलीव्हिजनवरूनच सर्वांसमोर तिला प्रपोज केलं होतं. ८ नोव्हेंबरला दिशाचा वाढदिवस होता आणि त्याचवेळी राहुलने बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसमोर दिशाला लग्नासाठी मागणी घातली होती. अशाप्रकरे पहिल्यांदाच राहुलने थेट टीव्हीवर त्याच्या प्रेमाची कबूली दिली होती.