राहुल वेद्यच्या पत्नीने मोनोकिनीत फ्लॉन्ट केलं बेबी बंप, फोटो पाहून चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 18:34 IST2023-07-19T18:28:54+5:302023-07-19T18:34:03+5:30

राहुल वैद्य आणि दिशा परमार लवकरच आईबाबा होणार आहेत.

rahul vaidya pregnant wife disha parmar flaunt baby bump in monokini actress photo seeking attention | राहुल वेद्यच्या पत्नीने मोनोकिनीत फ्लॉन्ट केलं बेबी बंप, फोटो पाहून चाहते म्हणाले...

राहुल वेद्यच्या पत्नीने मोनोकिनीत फ्लॉन्ट केलं बेबी बंप, फोटो पाहून चाहते म्हणाले...

कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं राहुल वैद्य आणि दिशा परमार लवकरच आईबाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर राहुल आणि दिशा चर्चेत आले होते. राहुलची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री दिशा परमार सध्या तिच्या प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करताना दिसत आहे. 

दिशाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिशाने लाल रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. स्विमिंगपूलशेजारी बसून दिशाने फोटोसाठी पोझही दिली आहे. या फोटोमध्ये दिशाने बेबी बंपही फ्लॉन्ट केल्याचं पाहायला मिळत आहे. दिशाचा हा हॉट फोटो पाहून चाहते अवाक् झाले आहेत. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

वरुण धवनने जान्हवी कपूरच्या कानाचा चावा घेतला अन्...; अभिनेत्याचं कृत्य पाहून नेटकऱ्यांचा संताप

एकाने कमेंट करत 'अतिसुंदर' असं म्हटलं आहे. दुसऱ्याने 'खूप छान दिसत आहेस', अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने "सुंदर दिशा' असं म्हटलं आहे. अनेकांनी दिशाला या फोटोवरुन ट्रोल केलं आहे. पण तिच्या चाहत्यांनी कमेंट करत दिशाला नकारात्मक कमेंटकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. तर दिशाला ट्रोल करणाऱ्यांना अनेकांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 

मोठ्या वादविवादानंतर 'द काश्मीर फाइल्स'वर येणार नवी वेबसीरिज, विवेक अग्निहोत्रींची घोषणा

छोट्या पडद्यावरील 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून दिशाला प्रसिद्धी मिळाली होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तर 'इंडियन आयडॉल' या शोमधून गायक राहुल वैद्य लोकप्रिय झाला. दिशा आणि राहुलने १६ जुलै २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. 'बिग बॉस १४'मध्ये ते दोघेही सहभागी झाले होते. तिथेच राहुलने दिशाला लग्नासाठी प्रपजोज केलं होतं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर आता ते आईबाबा होणार आहेत. 
 

Web Title: rahul vaidya pregnant wife disha parmar flaunt baby bump in monokini actress photo seeking attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.