इर्शाळवाडी दुर्घटना : 'डोकं सुन्नं झालय, तिथल्या आऊ..'; जुई गडकरीने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:37 AM2023-07-20T11:37:15+5:302023-07-20T11:39:52+5:30

Jui Gadkari: इर्शाळवाडीमध्ये जवळपास २५० लोकांची वस्ती आहे. त्यातील १०० पेक्षा जास्त जण बेपत्ता असल्यामुळे काल रात्रीपासून येथे मदतकार्य सुरु आहे.

raigad irshalwadi landslide incident marathi actress Jui Gadkari post viral | इर्शाळवाडी दुर्घटना : 'डोकं सुन्नं झालय, तिथल्या आऊ..'; जुई गडकरीने शेअर केली पोस्ट

इर्शाळवाडी दुर्घटना : 'डोकं सुन्नं झालय, तिथल्या आऊ..'; जुई गडकरीने शेअर केली पोस्ट

googlenewsNext

अतिवृष्टीमुळे खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळली आहे. या ठिकाणी राहणारी जवळपास ४० ते ५० घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली असून १०० पेक्षा जास्त जण अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती सध्या राज्यभरात पसरली आहे. त्यामुळे प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे. यामध्येच मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिने एक पोस्ट शेअर केली आहे.

इर्शाळवाडीमध्ये जवळपास २५० लोकांची वस्ती आहे. त्यातील १०० पेक्षा जास्त जण बेपत्ता असल्यामुळे काल रात्रीपासून येथे मदतकार्य सुरु आहे. NDRF ची टीम मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढायचं काम करत आहे. परंतु, गडावर चढणं कठीण असल्यामुळे या मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत. त्यामुळे सध्यस्थितीवर जुईने तिचा इर्शाळवाडीवर आलेला अनुभव सांगितला आहे.

काय आहे जुईची पोस्ट?

ईर्शाळगडावर गेलो तेव्हाच्या काही आठवणी… सकाळपासून ईर्शाळवाडी वर दरड कोसळल्याची बातमी बघतेय आणि डोकं सुन्नं झालय… तिथल्या आऊच्या हातचा स्वयंपाक अजुनही आठवतोय… एव्हढ्या ऊंचावर असलेली ठाकरवाडी… विज नाही.. मेडीकल, जिवनावश्यक वस्तू असं वरती ठाकरवाडीत काहीच नाही.. तरीही सदैव चेहरा हसरा… कसं काय जमतं त्यांना? प्रत्येक वेळेला १-१.३० तास चढुन वर जाणं किती अवघड ए… पण तरीही कसलीही complaint नं करता खुप कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं… माझ्या खुप जवळचा विषय आहे ठाकरं आणि ठाकरवाड्या… कितीतरी वाड्यांवर मी फिरलिये… त्यांच्या हातचं चविष्ठं जेवलिये… बातमी बघुन खुप वाईट वाटलं… सगळे सुखरुप असुदेत.., असं जुईने म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या घटनास्थळावर मोठ्या संख्येने मदतकार्य सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील घटनास्थळावर धाव घेतली आहे. तसंच दोन हेलिकॉप्टरने इथे मदतकार्य सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

Web Title: raigad irshalwadi landslide incident marathi actress Jui Gadkari post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.