'फक्त काही गोष्टी..'; बबिताने केला टप्पूसोबत साखरपुडा? राज अनादकटने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 11:46 AM2024-03-14T11:46:47+5:302024-03-14T11:47:27+5:30
Raj anadkat: राजपूर्वी मुनमुन दत्तानेही साखरपुड्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
सोशल मीडियावर सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat) आणि मुनमुन दत्ता या जोडीची जोरदार चर्चा होत आहे. या दोघांनी गुपचूप पद्धतीने साखरपुडा केल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर याविषयी अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हारल झाल्या आहेत. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचं राज अनादकटने स्पष्ट केलं आहे. सोबतच एक पोस्ट शेअर करत नाराजीही व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुनमुन दत्ता (बबिताजी) आणि राज अनादकट ( टप्पू) या जोडीची सातत्याने चर्चा रंगत आहे. ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर त्यांनी काल (१३ मार्च) रोजी साखरपुडा केल्याचंही म्हटलं जात होतं. या चर्चांवर नुकतंच मुनमुन दत्ताने स्पष्टीकरण दिलं होतं. तिच्या नंतर आता राजनेही पोस्ट शेअर करत त्याचं मौन सोडलं आहे.
काय आहे राजची पोस्ट?
राजने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. सगळ्यांना नमस्कार, फक्त काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी ही पोस्ट. सोशल मीडियावर तुम्ही ज्या गोष्टी पाहताय त्या सगळ्या खोट्या आणि निराधार आहेत, असं राजने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मुनमुन आणि राजने साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर कमालीची व्हायरल झाली होती.परंतु, ही पहिल्यांदा पसरलेली अफवा नसून यापूर्वीही त्यांच्या रिलेशनशीपच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.