राज ठाकरेंनी अंकिताच्या वडिलांना लिहिले पत्र, मनसे अध्यक्ष दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:10 IST2025-02-28T12:09:17+5:302025-02-28T12:10:25+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अंकिताच्या वडिलांना लिहलेले पत्र चर्चेत आलं आहे.

Raj Thackeray Wrote A Letter To Father Of Konkan Hearted Girl Ankita walawalkar Expressed His Sorrow For Not Attending Wedding | राज ठाकरेंनी अंकिताच्या वडिलांना लिहिले पत्र, मनसे अध्यक्ष दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...

राज ठाकरेंनी अंकिताच्या वडिलांना लिहिले पत्र, मनसे अध्यक्ष दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...

Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर ( Ankita walawalkar Wedding) ही नुकतंच १६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकली. अंकितानं मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अंकिताचं लग्न चांगलंच चर्चेत होतं. संगीत, मेंहदी आणि तिच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. सध्या संपूर्ण कलाविश्वातून अंकिता व कुणाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अंकिताच्या वडिलांना लिहलेले (Raj Thackeray Letter To Of Father Konkan Hearted Girl) पत्र चर्चेत आलं आहे. अंकिता वालावलकरने हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

अंकिता आणि कुणालनं आपल्या लग्नाचं खास आमंत्रण राज ठाकरे यांना दिलं होतं. पण, ते लग्नात गैरहजर होते. आता अखेर राज ठाकरे यांनी लग्नाला उपस्थित न राहण्यामागचं कारण सांगत, दिलगिरी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी अंकिताचे वडिल प्रमोद प्रभू वालावकर यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. राज ठाकरेंनी हे पत्र अंकिताच्या लग्नाआधी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी लिहिले होते. अंकिताने इन्स्टाग्रामवर  या पत्राचा फोटो शेअर करताना कॅप्शन दिलं, "मराठी भाषा गौरव दिन आणि आलेले हे पत्र". 

राज ठाकरेंनी अंकिताच्या वडिलांना लिहलेल्या पत्रात म्हटलं, "आपली कन्या चि. सौ. कां अंकिता हिच्या शुभ विवाहाचे आपण अगत्यपूर्वक पाठविलेलं निमंत्रण मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. सदर मंगल सोहळ्यास उपस्थित राहण्यास निश्चित आनंद वाटला असता. परंतु पूर्वनियोजित दौऱ्यामुळे उपस्थित राहता येत नसल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. आम्हा उभयतांकडून नव दांपत्यास शुभेच्छा. तसेच पुढील वैवाहिक आयुष्य सुखः समृद्धी व भरभराटीचे जावो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना. आपला नम्र, राज ठाकरे". विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी याच अंकिताचा नवरा कुणाल यासही लिहिले आहे. त्यानेदेखील इन्स्टाग्रामवर याविषयी पोस्ट शेअर केली.

अंकिता व कुणालच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर दोघांची पहिली भेट ही 'झी मराठी' पुरस्कार सोहळ्यादरम्यान झाली होती. यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर आता दोघांनी संसार थाटलाय. अंकिता सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. मात्र तिला 'बिग बॉस मराठी 5' खूप लोकप्रियता मिळाली. अंकिता ही एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. कुणाल भगत हा प्रसिद्ध संगीतकार आहे. त्याने आजवर अनेक गाण्यांचे दिग्दर्शन केलं आहे.

Web Title: Raj Thackeray Wrote A Letter To Father Of Konkan Hearted Girl Ankita walawalkar Expressed His Sorrow For Not Attending Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.