'खुँखार सुपर कॉप्स व्हर्सेस व्हिलन' मालिकेच्या चित्रीकरणावेळी अंकित राजला झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2017 11:12 AM2017-01-24T11:12:13+5:302017-01-24T16:42:13+5:30
मालिकांचे सेटवर अनेकवेळा एक्शन सीन्स करताना कलाकारांना दुखापत होण्याचे अनेक किस्से घडत असतात.आता 'खुँखार सुपर कॉप्स व्हर्सेस व्हिलन' या ...
म लिकांचे सेटवर अनेकवेळा एक्शन सीन्स करताना कलाकारांना दुखापत होण्याचे अनेक किस्से घडत असतात.आता 'खुँखार सुपर कॉप्स व्हर्सेस व्हिलन' या मालिकेतील व्हॅम्पायर वीर भूमिका साकारणारा अंकित राज घोड्यावरून एक्शन सीन्स करताना पडला आणि त्यामुळे त्याच्या पायालाही ईजा झाली आहे.व्हॅम्पायर असल्यामुळे त्याला या मालिकेसाठी घोडेस्वारी शिकणे गरजेचे होते.या शूटिंग दरम्यान अंकितचा घोडा उधळला क्षणातच काही कळणार इतक्यातच अंकित अक्षरशः लांब फेकला गेला आणि जोरात एका झाडावर आदळला.घोड्याचे रितसर प्रशिक्षण घेतले नसले तरी घोडेस्वारी माहिती आहे. त्यामुळे घोडेस्वारी करणे जास्त आव्हानात्मक वाटत नसले तरी अशा वेळी नेमके काय करावे हे सुचलेच नाही म्हणून मला स्वतःला सावरता आला नाही त्यामुळेच मला दुखापत झाल्याचे अंकितने सांगितले.
अंकित राजप्रमाणेच घोडेस्वारी करताना अभिनेत्री अनुजा साठेलाही दुखापत झाली होती.बाजीराव पेशवेंच्या आयुष्यावरील पेशवा बाजीराव या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुजा साठेही घोडेस्वारी करताना घोड्यावरून पडल्यामुळे दुखापत झाली होती.'पेशवा बाजीराव' या मालिकेत राधाबाई घोडस्वारी करत आहेत असे एका दृश्यात दाखवायचे होते. त्या दृश्यासाठी बॉडी डबल न वापरता अनुजाने स्वतः घोडेस्वारी करण्याचे ठरवले. तिने घोडेस्वारी खूपच चांगल्याप्रकारे केली आणि ते दृश्य खूपच चांगल्याप्रकारे चित्रीतदेखील होत होते. पण या दृश्याचे चित्रीकरण संपायच्या काही मिनीट अगोदर अनुजा घोड्यावरून जोरात पडली. त्यामुळे तिच्या पायाला आणि कंबरेला प्रचंड दुखापत झाली. पण तरीही त्याही अवस्थेत तिने तिचे चित्रीकरण पूर्ण केले आणि पुन्हा एकदा त्याच ताकदीने अभिनय केला.