म्हणून राजीव खंडेलवाल करतो अमिताभ बच्चन यांची पूजा, जाणून घ्या या मागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 12:56 IST2019-08-05T12:55:53+5:302019-08-05T12:56:09+5:30
अमिताभ बच्चन यांच्या फॅनफोलॉईंग बाबत आपल्या सगळ्यांच माहिती आहे. गेली अनेक दशकं ती सिनेइंडस्ट्रीवर राज्य करीत आहेत.

म्हणून राजीव खंडेलवाल करतो अमिताभ बच्चन यांची पूजा, जाणून घ्या या मागचे कारण
अमिताभ बच्चन यांच्या फॅनफोलॉईंग बाबत आपल्या सगळ्यांच माहिती आहे. गेली अनेक दशकं ती सिनेइंडस्ट्रीवर राज्य करीत आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर फक्त सर्व सर्वसामान्य प्रेक्षक प्रेम करत नाहीत तर त्यांच्यात फॅन्समध्ये सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे.
प्रणाम सिनेमातून अभिनेता राजीव खंडेलवाल कमबॅक करायला तयार आहे. या सिनेमाबाबत राजीवचे म्हणणे आहे की, 80 च्या दशकातील सिनेमांनाबाबत आभार व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. राजीवच्या मनात त्या दशकातील सगळ्या कलाकारांबाबत आदर आहे तसेच बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कामामुळे मी त्यांची पूजा करतो. या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली म्हणून राजीव खूश आहे.
आजतकच्या रिपोर्टनुसार राजीव म्हणाला की, प्रणाम एक वेगळ्या प्रकाराचा सिनेमा आहे. कारण या सिनेमात आम्ही काही तरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रणाम तुम्हाला क्लासिक हिंदी सिनेमाच्या काळाची आठवण करुन देईल.
मला माझ्या आवडत्या सिनेमांसोबत एक्सपिरिमेंट करायाला आवडते. त्यामुळे हा सिनेमा करण्याचा निर्णय मी घेतला. हा सिनेमा करताना मला खूप मज्जा आली कारण अमिताभ बच्चन यांची मी पूजा करतो त्यावेळीच्या सर्व कलाकारांचा मी आदर करतो. संजीव जायसवाल दिग्दर्शित प्रणाम सिनेमा 9 ऑगस्टला रिलीज होणार आहे.