"ती माझ्या मित्राशी...", राजीव सेनचा आता पूर्व पत्नीवर उलट आरोप, चारित्र्यावरच घेतला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:57 IST2025-04-14T15:57:16+5:302025-04-14T15:57:52+5:30

राजीव सेन आणि चारु असोपाचं नातं घटस्फोटानंतरही चर्चेत आहे. आता यामध्ये आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे.

rajeev sen accused ex wife charu asopa of talking to his best friend behind him | "ती माझ्या मित्राशी...", राजीव सेनचा आता पूर्व पत्नीवर उलट आरोप, चारित्र्यावरच घेतला संशय

"ती माझ्या मित्राशी...", राजीव सेनचा आता पूर्व पत्नीवर उलट आरोप, चारित्र्यावरच घेतला संशय

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) आणि त्याची पूर्व पत्नी चारु असोपा (Charu Asopa) यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. चारु असोपा लेकीला घेऊन नुकतीच बिकानेरला शिफ्ट झाली आहे. तिथे ती ऑनलाईन कपडे विक्रीचा बिझनेस करत आहे. मुंबईत राहणं परवडेना म्हणून ती शिफ्ट झाली. चारुची आर्थिक परिस्थिती खराब आहे अशी बातमी सगळीकडे पसरली. यावर राजीव सेनने सगळा ड्रामा आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. आता त्याने चारुच्या चारित्र्यावरच आरोप केले आहेत.

एका मुलाखतीत राजीव सेन म्हणाला, "आम्ही दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करत होतो आणि सुखी कुटुंबाप्रमाणे वेळ घालवत होतो. तेव्हा मी पाहिलं की चारु माझ्या २० वर्ष जुन्या मित्राशी माझ्यामागे बोलत होती. तिने त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करायलाही सुरुवात केली. मी तिला याबद्दल विचारलं तर तिने काहीही उत्तर दिलं नाही. चारुचे अनेक मित्र आहेत तरी तिने माझ्या बेस्ट फ्रेंडशी गुप्तपणे मैत्री करुन सर्व मर्यादा ओलांडल्या. तेव्हापासूनच चारु आणि माझे संबंध बिघडले होते. मला सहन होत नव्हतं."

"या माणसाला सगळा...", सुष्मिता सेनच्या भावावर भडकली पूर्व पत्नी, लेकीला घेऊन सोडली मुंबई

तो पुढे म्हणाला, "मला आता माझ्या लेकीलाही भेटता येत नाही. याचा आमच्या बापलेकीच्या नात्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता कोर्टात जाण्याचाच पर्याय राहिला आहे."

 चारु असोपा आणि राजीव सेनचा २०२३ साली घटस्फोट झाला होता. त्यांचा ४ वर्षच संसार टिकला. त्यांना जियाना ही ५ वर्षांची मुलगी आहे. राजीवने गरोदरपणातच विश्वासघात केल्याचा चारुने आरोप केला होता. दोघांनी एकत्र येण्याचा बराच प्रयत्न केला मात्र नंतर ते कायमचे वेगळे झाले.

Web Title: rajeev sen accused ex wife charu asopa of talking to his best friend behind him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.