राजेंद्र चावला सांगतात, मी नट होईन असे मला कधी वाटले देखील नव्हते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:28 PM2018-07-12T15:28:32+5:302018-07-12T15:29:57+5:30

राजेंद्र चावला हे एका व्यापारी कुटुंबातील आहेत... मी कधी नट होईन हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते असे त्यांनी नुकतेच जिंदगी के क्रॉसरोड्स या कार्यक्रमात सांगितले.

rajendra chawla said I never feel that I can be actor | राजेंद्र चावला सांगतात, मी नट होईन असे मला कधी वाटले देखील नव्हते

राजेंद्र चावला सांगतात, मी नट होईन असे मला कधी वाटले देखील नव्हते

googlenewsNext

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील जिंदगी के क्रॉसरोड्स या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मत आणि अभिप्राय यांच्या भावनिक रोलर कोस्टर राइडच्या जिंदगी के क्रॉसरोड्स नामक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कपूर करत आहे. शबिना खान यांनी या कार्यक्रमाच्या निर्मात्या असून या कार्यक्रमाचे लेखन महादेव यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात एक नवीन गोष्ट असते आणि त्या गोष्टीतील नायकापुढे असलेला पेचप्रसंग स्टुडिओतील प्रेक्षकांसमक्ष चर्चेसाठी खुला ठेवला जातो. हा छोट्या पडद्यावरचा एक अत्यंत नवा असा फॉरमॅट आहे.
जिंदगी के क्रॉसरोड्स या कार्यक्रमात ‘मुन्शीजी’ या व्यक्तीची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. यात राजेंद्र चावला हा अष्टपैलू नट प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हे कथानक एका अशा प्रामाणिक माणसाभोवती फिरते, जो कुणाचे काहीही वाईट करत नाही आणि त्याचा स्वतःवर दृढ विश्वास आहे. ही एक भावस्पर्शी गोष्ट आहे आणि ती उपस्थित प्रेक्षकांना आपले मत मांडण्यास तर उद्युक्त करेलच पण त्या निर्णयामागील कारण देखील काढून घेण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून प्रस्तुत कथेसाठी प्रेक्षकांच्या अनेक शक्यता दर्शवणार्‍या मतांचा एक संच तयार होईल. याविषयी राजेंद्र चावला यांनी सांगितले, ‘मला जेव्हा या भूमिकेसाठी प्रॉडक्शन हाऊसकडून बोलावणे आले, तेव्हा मी खूप आनंदलो होतो. या कार्यक्रमातील माझी व्यक्तिरेखा एका प्रामाणिक आणि सरळमार्गी माणसाची आहे. या भूमिकेची तयारी करताना मी माझ्या वडिलांना डोळ्यांसमोर ठेवले होते... कारण ते माझे आदर्श आणि माझी प्रेरणा आहेत. माझ्या जीवनात आलेली द्विधा म्हणजे, चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योग यातून एकाची निवड करणे ही होती आणि मजेची गोष्ट म्हणजे, मी एका व्यापारी कुटुंबात जन्माला आलो आहे आणि मी कधी नट होईन हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते. मला वाचनाचाही कंटाळा होता. जेव्हा माझ्या कुटुंबियांनी स्थिरस्थावर होण्यासाठी माझ्यामागे तगादा लावला, त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या मदतीने अभिनयाकडे वळलो.”

Web Title: rajendra chawla said I never feel that I can be actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.