राजेश शृंगारपुरेला प्रेक्षकांनी दाखवला बिग बॉसच्या घराबाहेरचा रस्ता!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 04:17 AM2018-05-21T04:17:14+5:302018-05-21T09:47:14+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्ये देखील ...

Rajesh Shringarpura showcased the Big Boss's outdoors road! | राजेश शृंगारपुरेला प्रेक्षकांनी दाखवला बिग बॉसच्या घराबाहेरचा रस्ता!

राजेश शृंगारपुरेला प्रेक्षकांनी दाखवला बिग बॉसच्या घराबाहेरचा रस्ता!

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्ये देखील कोणा एकाला घराबाहेर जावं लागणार आहे. या आठवड्यामध्ये जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस हे डेंजर झोनमध्ये आले, आणि राजेशला घराबाहेर जावं लागलं. राजेश घराबाहेर पडल्याचे दु:ख सगळ्यांच झाले. रेशम, उषा नाडकर्णी, सुशांत, आस्ताद, जुई, भूषण खूप भावुक झाले. नेहमीप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी राजेशला देखील मिळाली तेव्हा राजेशने घरातील काही सदस्यांना तर काही सदस्यांनी त्याच्या जवळ त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण नवा कॅप्टन बनेल ? कोणते टास्क सदस्यांना मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. 
 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विकेंडचा डाव मध्ये सदस्यांनी एकमेकांना दिला फुलांचा आणि काट्यांचा मान. स्मिताने उषाजींना गुलाबाचे फुल दिले, उषाजींनी स्मिताची बरीच तारीफ देखील केली, तर राजेशला काटे म्हणजे निवडुंगाचे झाड दिले. उषाजींनी मेघाला ती खूप बोलते म्हणून प्रेमाने काट्यांचा मान दिला, तर त्यांच्या लाडक्या पुष्करला मिळाला फुलांचा मान. तर भूषणने सुशांतला तर हर्षदाने रेशमला फुलाचा मान दिला. रेशमने आणि भूषणने मेघाला काट्यांचा मान दिला. सईने राजेशला काटे तर मेघाला गुलाबाचा मान दिला. 

 

Web Title: Rajesh Shringarpura showcased the Big Boss's outdoors road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.