गुड न्यूज! Raju Srivastav 15 दिवसांनंतर आले शुद्धीवर, प्रकृतीत हळुहळू होतेय सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 12:34 PM2022-08-25T12:34:11+5:302022-08-25T12:46:18+5:30

Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आज सकाळी राजू यांना शुद्ध आली.

Raju Srivastav health update comedian gained consciousness today his pro gives health update | गुड न्यूज! Raju Srivastav 15 दिवसांनंतर आले शुद्धीवर, प्रकृतीत हळुहळू होतेय सुधारणा

गुड न्यूज! Raju Srivastav 15 दिवसांनंतर आले शुद्धीवर, प्रकृतीत हळुहळू होतेय सुधारणा

googlenewsNext

Raju Shrivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आज सकाळी राजू यांना शुद्ध आली. राजू गेल्या १५ दिवसांपासून AIIMSमध्ये दाखल आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर प्रत्येक क्षणी लक्ष ठेवून आहे. राजू बरे होतील अशी आशा सर्वांना होती. देशभरातून त्यांचे चाहते राजू यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि आता राजू  शुद्धीवर आले आहेत.

राजू श्रीवास्तव यांचे स्वीय गरवित नारंग  यांनी कॉमेडियनच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले- 'राजू श्रीवास्तव यांना सकाळी 8.10 वाजता शुद्धी आली. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. राजू श्रीवास्तवर शुद्धीवर आल्याने  कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू उमलले आले आहे. राजू लवकर बरे व्हावा यासाठी प्रार्थना करणाऱ्या राजूच्या सर्व चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गेल्या 10 ऑगस्टला जिममध्ये वर्कआऊट करताना राजू श्रीवास्तव अचानक हृदयविकाराचा झटका आला हरेता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं हरेतं. 10 ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजू श्रीवास्तव यांनी ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दूरदर्शनवरील शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी आपला यूपीचा अंदाज दाखवला आणि आपल्या पंच लाइनने लोकांना हसवलं.

Web Title: Raju Srivastav health update comedian gained consciousness today his pro gives health update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.