Raju Srivastav Passed Away: बर्थ डे पार्टीत गायले, मुंबईत रिक्षा चालवली...! अशी होती राजू श्रीवास्तव यांची स्ट्रगल स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 10:57 AM2022-09-21T10:57:50+5:302022-09-21T10:58:17+5:30

Raju Srivastav Passed Away: दिग्गज कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Raju Srivastav Passed Away: Sung at birthday parties, drove a rickshaw in Mumbai...! Such was the struggle story of Raju Srivastava | Raju Srivastav Passed Away: बर्थ डे पार्टीत गायले, मुंबईत रिक्षा चालवली...! अशी होती राजू श्रीवास्तव यांची स्ट्रगल स्टोरी

Raju Srivastav Passed Away: बर्थ डे पार्टीत गायले, मुंबईत रिक्षा चालवली...! अशी होती राजू श्रीवास्तव यांची स्ट्रगल स्टोरी

googlenewsNext

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा एक तारा आज निखळला. कॉमेडीयन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे आज निधन झालं. १० ऑगस्टला ट्रेड मिलवर वर्कआऊट करत असतानाच राजू कोसळले आणि त्यानंतर शुद्धीवर आलेच नाहीत. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. राजू श्रीवास्तव हे टीव्ही इंडस्ट्रीतलं मोठं नावं होतं. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अपार कष्ट वेचले होते. प्रसंगी मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षा इेखीज चालवली.... राजू श्रीवास्तव यांची स्ट्रगल स्टोरी तुमच्याही डोळ्यांत पाणी आणेल.

राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी कानपूर येथे झाला होता. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव प्रसिद्ध कवी होते. बलाई काका नावने ते कविता करायचे. कवीचा मुलगा म्हटल्यानंतर लहानपणी सगळे राजू यांना कविता म्हणायला सांगायचे. पुढे पुढे राजू बर्थ डे पार्टीमध्ये कविता ऐकवू लागले होते. १९८२ साली राजू श्रीवास्तव मुंबईत आले. पण मुंबईत निभावं लागणं सोप्प नव्हतं. पोटापाण्यासाठी त्यांनी मुंबईत रिक्षा चालवली. बॉलिवूड चित्रपटांत छोटे मोठे रोल करत त्यांनी करिअरची सुरूवात केली. ‘मैने प्यार किया’ या सलमानच्या सुपरडुपर हिट सिनेमात अगदी काही सेकंदाची भूमिका त्यांनी केली. या चित्रपटात ते ट्रक क्लीनरच्या भूमिकेत दिसले होते.
२००५ साली मात्र या कलाकाराचं नशीब फळफळलं. स्टार वनच्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये त्यांनी भाग घेतला आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. कॉमेडियन म्हणून त्यांना नवी ओळख मिळाली. यापश्चात बिग बॉस ३, नच बलिए अशा शोमध्ये ती दिसले.

अमिताभ बच्चन यांच्या मिमिक्रीसाठी मिळाले होते ५० रूपये...
राजू श्रीवास्तव अमिताभ बच्चन यांची अफलातून मिमिक्री करायचे. अमिताभ यांचा शोले हा चित्रपट राजू यांना प्रचंड आवडला होता. हा चित्रपट पाहिला आणि राजू अमिताभ यांच्या प्रेमात पडले. इतके की, अगदी त्यांच्यासारखं बोलणं, त्यांच्यासारखं उठणं, बसणं त्यांनी सुरू केलं. इथून ते अमिताभ यांची मिमिक्री करायला लागले. अमिताभ यांची मिमिक्री केल्याबद्दल पहिल्यांदा त्यांना ५० रूपये मिळाले होते.

Web Title: Raju Srivastav Passed Away: Sung at birthday parties, drove a rickshaw in Mumbai...! Such was the struggle story of Raju Srivastava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.