Raju Srivastav Health Update:राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, भावाने दिली लेटेस्ट हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 03:49 PM2022-08-20T15:49:51+5:302022-08-20T15:56:40+5:30

राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय सतत त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट्स देत असतात. आज पुन्हा राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव याने कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत लेटेस्ट माहिती दिली आहे.

Raju Srivastava health update some infections are now getting better said comedian brother Dipu Srivastav | Raju Srivastav Health Update:राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, भावाने दिली लेटेस्ट हेल्थ अपडेट

Raju Srivastav Health Update:राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, भावाने दिली लेटेस्ट हेल्थ अपडेट

googlenewsNext

Raju Srivastava Health Update: आपल्या कॉमेडीने सगळ्यांना खळखळून हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. गेल्या 10 ऑगस्टला राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच ते कोसळले. तेव्हापासून दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करतायेत. दरम्यान आज राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी राजू यांच्य प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

राजू यांच्या प्रकृती होतेय सुधारणा
कॉमेडियनच्या तब्येतीबद्दल माहिती देताना राजू श्रीवास्तवचा भाऊ दीपू श्रीवास्तव म्हणाले, एका सिनिअर महिला डॉक्टरांनी राजू यांची कंडिशन पाहिली आहे. त्या म्हणाल्या की, जे संसर्ग झाले होते ते आता कमी होत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या भावानेही सांगितले की, राजूच्या उत्तम आरोग्यासाठी कुटुंबीयांनी आज पूजा ठेवली आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवाही उठवल्या जात आहेत. यापूर्वी राजू यांचा भाऊ दीपूने आज तकला एक व्हिडिओ पाठवला होता. त्यात त्यांनी कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले होते. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना ते अजूनही आयसीयूमध्ये असल्याचे सांगितले.

दीपू पुढे म्हणाले, राजू भाई एक फायटर आहे. ते लवकरच हे युद्ध जिंकतील आणि पुन्हा एकदा आपल्या कॉमेडीने तुम्हाला खळखळून हसवतील.  खोट्या अफवांकडे लक्ष देऊ नका. मी इतकंच म्हणेन की, तुम्ही लोक प्रार्थना करत राहा. डॉक्टर  त्यांचे काम करत आहेत. डॉक्टरांची टीम आहे.डॉक्टरांची संपूर्ण टीम अहोरात्र प्रयत्न करत आहे. 

Web Title: Raju Srivastava health update some infections are now getting better said comedian brother Dipu Srivastav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.