Raju Srivastava शुद्धीवर आले की नाही? मुलगी अंतरा हिने दिली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 09:46 AM2022-08-26T09:46:17+5:302022-08-26T09:56:30+5:30
Raju Srivastava : राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले अशी बातमी समोर आली होती, यावर त्यांची मुलगी अंतराने एक पोस्ट शेअर करत कोणतीही चुकीची माहिती शेअर करु नका अशी विनंती केली आहे.
Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी गुरुवारी समोर आली होती. राजू यांचा मित्र सुनील पाल याने ही व्हिडिओ पोस्ट करत ते शुद्धीवर आल्याची अपडेट दिली होती. परंतु असे काहीही घडलेले नाही. राजू यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव हिने ही माहिती दिली आहे. अंतराने राजू यांच्या इन्स्टा हँडलवर एक नोट पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने कोणतीही चुकीची माहिती शेअर करु नका अशी विनंती केली आहे.
व्हेंटिलेटरवर असलेल्या राजू राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिने तिच्या वडिलांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नोट शेअर केली आहे. जिथे तिने राजू यांची प्रकृतीबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.
अंतराने लिहिले- 'माझे वडील राजू श्रीवास्तवजी यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते हळूहळू बरं होत आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दिल्लीचं AIIMS रुग्णालय आणि राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीवरच केवळ विश्वास ठेवा. इतर कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये.
अंतराने पुढे लिहिले की, ' AIIMS मधील डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम दिवसरात्र त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपण सर्वांना विनंती आहे की, तुमच्या प्रार्थना सुरु ठेवा. अंतरा श्रीवास्तव, राजू श्रीवास्तव यांची मुलगी.' अंतराने इतर कोणत्याही सोर्सवर विश्वास ठेऊ नका असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
दरम्यान राजू श्रीवास्तव यांचा पुतणा कुशल श्रीवास्तव यांनेही मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यानेही राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा खुलासा केला आहे. मात्र ते शुद्धीवर आल्याच्या बातम्या खोट्या आहेत. त्यांनी दोन वेळा डोळे उघडले आणि हातही हलवला, पण ते आमच्यासाठी पुरेसे नाही, त्याने पूर्ण बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे.”