दुर्दैव! राजू श्रीवास्तव यांचं शेवटचं स्वप्न राहिलं अधूरं...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:59 PM2022-09-21T14:59:00+5:302022-09-21T15:11:07+5:30

राजू श्रीवास्तव हे टीव्ही इंडस्ट्रीतलं मोठं नावं होतं. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अपार कष्ट वेचले होते.

Raju Srivastava's last dream will never come true | दुर्दैव! राजू श्रीवास्तव यांचं शेवटचं स्वप्न राहिलं अधूरं...

दुर्दैव! राजू श्रीवास्तव यांचं शेवटचं स्वप्न राहिलं अधूरं...

Next

गेली ४० दिवस मृत्यूशी झुंज देत असलेले कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचं आज निधन झालं.वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांना हसवण्यात गेले, त्यांच्या विनोदामुळे अनेकांनी आपले दु:ख विसरले. राजू श्रीवास्तव हे टीव्ही इंडस्ट्रीतलं मोठं नावं होतं. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अपार कष्ट वेचले होते. प्रसंगी मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षा देखील चालवली. पण आज हा निखळला आहे आणि त्यामुळे त्यांचे शेवटचं स्वप्नही अपूर्ण राहिले आहे.

राजू यांचे शेवटचे स्वप्न होते की उत्तर प्रदेश, बिहार  चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावणाऱ्या या प्रांतातील कलाकारांनी अभिनयविश्वात नाव कमवण्यासाठी मुंबईची गरज भासू नये. त्याच्यासाठी नोएडामध्ये उभारली जाणारी फिल्म सिटी ही या सगळ्या समस्येवरील तोडगा होती. यामुळेच ते 'नोएडा फिल्म सिटी'ची स्वप्न पाहत होता. राजू हे यूपी फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे चेअरमनही होते. न्यूज18शी बोलताना राजू एकदा म्हणाले की, दिल्ली, यूपी, मध्यप्रदेश आणि बिहारमधून  लोकांनी मुंबईत येऊन का भटकायचं? याठिकाणी फिल्मसिटी झाली तर अनेक प्रादेशिक लेखकांना येथे काम करण्याची आणि आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.

दरम्यान राजू यांच्यावर एम्स रुग्णालयात मोठ्या डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरू होते. मात्र या उपचारांना यश आले नाही. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थितपणे पोहोचत नव्हता, हेच त्यांच्या मृत्यूचे मोठे कारण ठरले. सातत्याने मेनुअल ऑक्सिजन सप्लाय केल्यामुळे मेंदूतील पेशी स्वत: काम सुरू करतील, अशी अपेक्षा डॉक्टरांना होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली.
 

Web Title: Raju Srivastava's last dream will never come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.