"तुम लोगोके कारण मुंबई बंद होगाया", सेल्फी काढायला आलेल्या राखीने चाहत्याला सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 02:58 PM2021-04-07T14:58:48+5:302021-04-07T14:59:30+5:30
Rakhi Sawant reacts on a fan asking for selfie, कोरोनाचे नियम पाळत नाहीत.मास्क भाईसाहाब पेहले मास्क लगाव , मास्क नाही लगाते तुम जैसे लोगोके कारण मुंबई बंद होगाया है. गलत बात है.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेते, राजकीय व्यक्ती अशा अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:च्या बचावासाठी मास्क आवश्यकच आहे. मास्क वापरा सुरक्षित राहा असे सगळेच सेलिब्रिटी जनतेला आवाहन करताना दिसतायेत.नुकतेच वर्कआऊट करून बाहेर पडलेल्या राखीला एका चाहत्याने सेल्फी काढण्यासाठी तिला विचारले. विनामस्क बघून राखी संतापली आणि चाहत्याला आधी मास्क लावण्याचे सांगितले. कोरोनाचे नियम पाळत नाहीत.मास्क भाईसाहाब पेहले मास्क लगाव , मास्क नाही लगाते तुम जैसे लोगोके कारण मुंबई बंद होगाया है. गलत बात है.
अनेक सेलिब्रिटी अडकले कोरोनाच्या विळख्यात
नुकतेच अक्षय कुमारचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर अभिनेता गोविंदालासुद्धा कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. सोमवारी अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि विकी कौशल आणि कतरिना कैफलाही कोरोनाची लागण झाली आहे.
यापूर्वी रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन आणि सतीश कौशिक, फातिमा सना शेख, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली आहे.