राखी सावंत सांगतेय, माझ्यात पवित्र रक्त असल्याने होणार नाही कोरोना, नेटिझन्सने धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 11:52 AM2021-05-06T11:52:33+5:302021-05-06T11:57:29+5:30

राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केवळ 18 तासांत 2 लाख 50 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत.

Rakhi Sawant believes she and her family will not contract Covid-19, got trolled | राखी सावंत सांगतेय, माझ्यात पवित्र रक्त असल्याने होणार नाही कोरोना, नेटिझन्सने धरले धारेवर

राखी सावंत सांगतेय, माझ्यात पवित्र रक्त असल्याने होणार नाही कोरोना, नेटिझन्सने धरले धारेवर

googlenewsNext
ठळक मुद्देमला किंवा माझ्या कुटुंबाला कोरोना होणार नाही असा दावा ड्रामा क्वीन राखी सावंतने केला आहे. 

सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहेत. अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा प्रसार प्रचंड झाला असला तरी मला किंवा माझ्या कुटुंबाला कोरोना होणार नाही असा दावा ड्रामा क्वीन राखी सावंतने केला आहे. 

राखी सावंतला नुकतेच मुंबईतील एका कॉफी शॉपच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यावेळी तिने दावा केला की, तिला कोरोना होऊ शकत नाही... राखीचे म्हणणे आहे की, जीसस तिच्यासोबत असून तिच्यात पवित्र रक्त आहे. त्यामुळे कोरोना तिच्यापर्यंत पोहोचणारच नाही. 

एवढेच नव्हे तर देशात सध्या कोरोना लसीचे प्रमाण कमी असल्याने माझ्या हिस्स्याची लस दुसऱ्या कोणाला तरी द्या...  मला काय माझ्या घरातील कोणालाच कोरोना होणार नाही असे देखील ती सांगताना दिसत आहे. 

राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केवळ 18 तासांत 2 लाख 50 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. राखी मास्क काढून बोलत असल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तसेच ती काहीही बरळत असल्याचे नेटिझन्स कमेंटद्वारे सांगत आहेत. खऱ्या आयुष्यात असताना देखील बिग बॉसच्या घरात असल्यासारखीच ती वागते असे देखील लोक तिला सुनावताना दिसत आहेत. 

Web Title: Rakhi Sawant believes she and her family will not contract Covid-19, got trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.