भररस्त्यात बसून ढसाढसा रडली राखी सावंत, भावुक करेल हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 10:21 AM2021-04-20T10:21:56+5:302021-04-20T10:23:34+5:30

Rakhi Sawant emotional video : भररस्त्यात डोकं टेकलं, हात जोडले आणि सलमान खानचं नाव घेत राखी ढसाढसा रडू लागली...

rakhi sawant emotional video after her mother operation | भररस्त्यात बसून ढसाढसा रडली राखी सावंत, भावुक करेल हा व्हिडीओ

भररस्त्यात बसून ढसाढसा रडली राखी सावंत, भावुक करेल हा व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देराखीची आई गेल्या अनेक दिवसांपासून पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. राखी बिग बॉस 14 मध्ये असताना तिला आईची किमोथेरपी व कॅन्सरबद्दल माहित झाले होते. 

राखी सावंतची (Rakhi Sawant) आई जया सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी लढतेय. राखी ‘बिग बॉस 14’मध्ये असतानाच तिला आपल्या आईच्या आजाराबद्दल कळले होते. आईच्या उपचारासाठी राखीजवळ पैसे नव्हते. शोमधून कमावलेल्या पैशातून ती आईचा उपचार करू इच्छित होती. अशावेळी सलमान खान तिच्या मदतीला धावून आला. राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च त्याने आपल्या खांद्यावर घेतला आणि काल राखीच्या आईवर यशस्वी शस्त्रक्रिया करत, तिच्या पोटातील कॅन्सरचा ट्युमर बाहेर काढण्यात आला. आई आता कॅन्सरमुक्त झाली, हे पाहून राखी भावूक झाली. सलमानचे आभार मानताना तिला शब्द कमी पडलेत आणि ती ढसाढसा रडू लागली. अगदी भररस्त्यावर डोकं टेकत, हात जोडतं तिने सलमानचे नाव घेत त्याचे आभार मानलेत. (Rakhi Sawant emotional video)

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ‘माझ्याजवळ पैसे नव्हते़ आईच्या उपचारासाठी डॉक्टरांनी खूप पैसे सांगितले होते. कमीत कमी 15-20 दिवस हॉस्पीटलमध्ये ठेवावे लागणार, असे म्हणाले होते. अशावेळी सलमान व सोहेल भाई देवदूतासारखे माझ्या मदतीला धावून आलेत. त्यांच्यामुळेच माझी आई वाचली,’ असे राखी म्हणते आणि ढसाढसा रडू लागते़,
  अक्षरश: जमिनीवर डोकं टेकून ती सलमान खान आणि सोहेल खानचे आभार मानते.

 राखीची आई गेल्या अनेक दिवसांपासून पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. राखी बिग बॉस 14 मध्ये असताना तिला आईची किमोथेरपी व कॅन्सरबद्दल माहित झाले होते. आईच्या उपचारासाठी राखीला पैशांची गरज होती. या पैशासाठीच तिने 10 लाख रूपये घेऊन बिग बॉसचा शो सोडला होता. याशिवाय सलमान व सोहल खानने राखीची मदत केली होती. सलमानने राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला. 

Web Title: rakhi sawant emotional video after her mother operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.