Rakhi Sawant Ex Husband : 'राखीचं प्रकरण मला माहित आहे, मुलींनी लव्ह जिहादमध्ये...', राखीच्या पहिल्या पतीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:44 PM2023-02-10T12:44:52+5:302023-02-10T12:46:19+5:30
राखी आदिलसोबत कशी अडकली हे सर्व मला माहित आहे असा खुलासा त्याने केला आहे. दरम्यान त्याने लव्ह जिहादचाही उल्लेख केला आहे.
Rakhi Sawant Ex Husband : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत प्रकरणात आता राखीचा पहिला पती रितेश कुमारनेही (Ritesh Kumar) उडी घेतली आहे. राखी सध्या मोठ्या कठीण काळातून जात आहे. अशावेळी रितेश राखीला पाठिंबा द्यायला पुढे आला आहे. राखी आदिलसोबत कशी अडकली हे सर्व मला माहित आहे असा खुलासा त्याने केला आहे.
राखीचा पूर्वपती रितेश कुमारने जवळपास १ तासाचे इन्स्टाग्राम लाइव्ह करत संवाद साधला आहे. राखीचा सध्याचा कठीण काळ, त्याचं राखीसोबतचं नातं यावर तो बरंच काही बोलला आहे. दरम्यान त्याने लव्ह जिहादचाही उल्लेख केला आहे. रितेश कुमार म्हणाला, 'राखीच्या डोळ्यात सत्य दिसतं. पण आता निर्णय कोर्टातच होईल. राखीने मला तीन महिन्याआधीच सगळं सांगितलं होतं. ती खोटं बोलत नाही. मी राखीसोबत आहे, पण मी देखील परेशान आहे. ज्या दु:खात ती आहे त्याच दु:खात मीही होतो. मी त्या कॅरेक्टरचा नाहीए. मी दोन वेळा प्रेमात पडलो आणि दोन्ही वेळेस मला धोकाच मिळाला.'
तो पुढे म्हणतो, 'माझ्याकडे MBA, MTech आणि LLB या डिग्री आहेत. मला कशाचीच कमी नाही. माझ्यासोबत धोका झाला आणि लोकांना वाटले मी चुकीचा आहे. राखी मी तुझ्यासोबत आहे. तुझ्यासोबत तुझा भाऊ पण होता. लव्ह जिहाद मध्ये अडकणाऱ्या मुलींसाठी हे उदाहरण आहे.'
Rakhi Sawant : 'मला आई व्हायचं होतं, पण...' राखी सावंतचा आक्रोश; आदिलच्या कुटुंबावरही केले आरोप
राखीने आतापर्यंत आदिल दुर्रानीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदिलने राखीला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच तिचे १.५० कोटी रुपये घेतल्याचीही तक्रार तिने केली आहे. सध्या आदिल तुरुंगात असून अंधेरी पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.