Video : हे फक्त राखी सावंतच करू शकते! लोकांना बोलावून बोलावून भागवली सेल्फीची हौस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:44 AM2021-03-18T10:44:30+5:302021-03-18T10:46:45+5:30

पापाराझींचे कॅमेरे अन राखी सावंतचे नखरे, पाहा व्हिडीओ

Rakhi Sawant giving some selfie with fan's at gym in Mumbai | Video : हे फक्त राखी सावंतच करू शकते! लोकांना बोलावून बोलावून भागवली सेल्फीची हौस

Video : हे फक्त राखी सावंतच करू शकते! लोकांना बोलावून बोलावून भागवली सेल्फीची हौस

googlenewsNext
ठळक मुद्देझोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या मुद्यावर राखीने नेहमीप्रमाणे वेगळेच मत मांडले.

‘बिग बॉस 14’ संपला. पण या शोची सर्वात मोठी एंटरटेनर राखी सावंत हिचे ‘बिग बॉस’ प्रेम कमी व्हायचे नाव नाही. अगदी पापाराझींच्या कॅमे-यासमोरही राखी ‘बिग बॉस’सारखी मस्ती करताना दिसतेय. इतकेच नाही तर लोकांना बोलवून बोलवून सेल्फी देतेय. तिचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने राखीचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत राखी बिग बॉसची आठवण करताना दिसतेय. व्हिडीओत राखी पिंक कलरच्या जिम आऊटफिटमध्ये दिसतेय. समोर पापाराझींचे कॅमेरे पाहून राखी तिच्या अंदाजात नखरे सुरु करते.  

क्या मैं स्लिम हो रही हूं बिग बॉस? आपने मुझे बहुत पराठे और राइस खिलाया है बिग बॉस, असे ती म्हणते. यानंतर आईच्या प्रकृतीची माहितीही ते देते. आईचा किमो सुरु आहे. किमो झाल्यावर दोन दिवस ती शुद्धीवर नसते. शुद्धीवर आल्यावर औषधं द्यावी लागतात, असे म्हणते आणि अचानक समोर उभ्या असलेल्या अंकलला तुम्हाला सेल्फी हवी का? असे विचारलेत. यानंतर समोरच्या लोकांना बोलावून बोलावून सेल्फी देते. मला वोट करायचा. मैं जिधर भी जाऊं, किसी भी रिअ‍ॅलिटी शोज में मुझे वोट करने का, असे ती म्हणते.

झोमॅटोच्या मुद्यावर वेगळेच मत
झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या मुद्यावर राखीने नेहमीप्रमाणे वेगळेच मत मांडले. त्या डिलिव्हरी बॉयसोबत खूप अन्याय झाला. मला दु:ख आहे. मित्रांनो, झोमॅटो, स्विगीवाले तुमच्या पोटाची आग विझवण्यासाठी येतात. त्यांचा आदर करा. प्रत्येकाचा आदर करा. झोमॅटोचा तो मुलगा कदाचित देशाचा पंतप्रधानही होऊ शकतो. प्रेम करा. प्रेम करायला टॅक्स थोडीच लागतो, असे ती म्हणाली.

Web Title: Rakhi Sawant giving some selfie with fan's at gym in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.