Rakhi Sawant Marriage : 'माझ्या कुटुंबाने अजून राखीला स्वीकारले नाही, त्यांना...' राखीच्या नवऱ्याने पहिल्यांदाच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 09:44 AM2023-01-14T09:44:56+5:302023-01-14T09:45:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून राखीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मात्र तिचा पती आदिलने यावर काहीच स्पष्टीकरण दिले नव्हते.
Rakhi Sawant Marriage : ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा चर्चेत आहे. कारण आहे तिचं लग्न. होय, बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी खानसोबत 'निकाह' करण्याच्या राखीच्या निर्णयाने पुन्हा एकदा सर्वांना हैराण केलं आहे. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. मी व आदिल आम्ही ७ महिन्यांपूर्वीच लग्न केलं होत, मात्र आदिलने माझ्यावर हे लग्न लपवण्यासाठी दबाव टाकला. 'निकाह'सोबत आम्ही कोर्ट मॅरेजही केलं, मात्र आत्तापर्यंत हे सगळं जगापासून लपवून ठेवलं होतं, असा खुलासा तिने केला होता. मात्र आता आदिलने स्वत: त्यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राखीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मात्र तिचा पती आदिलने यावर काहीच स्पष्टीकरण दिले नव्हते. इतके दिवस आदिल का शांत होता याचे कारण आता समोर आले आहे.एका मुलाखतीत आदिल म्हणाला, 'मी आणि राखीने लग्न केले आहे.आम्ही दोघे खूश आहोत. मात्र अजूनपर्यंत माझ्या परिवाराने राखीला स्वीकारलेले नाही. त्यांना माहित आहे की मी राखीसोबत आहे पण सध्या आम्ही त्यांना मनवत आहोत. यासाठी थोडा वेळ जाईल. आधी मी लग्नाच्या बातमीवर नकार देत होतो पण मी पाहिले जिथे राखी असते तिथे कॉन्ट्रोव्हर्सी होते. मग मी विचार केला आता मीडियासमोर लग्नाची बातमी कन्फर्म करायला हवी.
राखीला वाटत होती भीती
राखी याआधी एकदा म्हणाली होती की, 'बहिणीचं लग्न होईपर्यंत आपलं लग्न लपवून ठेव, असं आदिल मला म्हणाला होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मी ‘बिग बॉस मराठी ४ ’ मध्ये गेल्यावर बाहेर अनेक गोष्टी घडल्या. मग मात्र माझा संयम संपला आणि मी लग्नाबद्दल खुलासा केला. मी घाबरली होते. तो माझ्यावर प्रेम करतो, पण मग लग्न झालंच नाही, असं का म्हणतोय मला माहित नाही. कदाचित त्याच्या कुटुंबाचा दबाव असावा. सकाळपासून तो माझ्यासोबत बोलत नाहीये. माझ्यासोबतच नेहमी असं का घडतं?
इतकंच नाही, तर राखीने लव्ह जिहादकडेही इशारा केला आहे. मला आता भीती वाटतेय. जे सगळीकडे होतंय, तेच माझ्यासोबत होईल, अशी भीती मला वाटू लागली आहे, असं ती टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. दुसरीकडे आदिलने राखीसोबत लग्न केल्याचा इन्कार केला आहे.