थँक्यू बेटा...! किमोथेरपी सुरु असतानाच राखी सावंतच्या आईने मानले सलमानचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:48 AM2021-02-26T11:48:23+5:302021-02-26T11:49:34+5:30

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरआईची अवस्था पाहून राखीला धक्का बसला होता. आईचे फोटो शेअर करत, तिने तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.

rakhi sawant mother jaya sawant is battling with cancer say thanks to salman khan | थँक्यू बेटा...! किमोथेरपी सुरु असतानाच राखी सावंतच्या आईने मानले सलमानचे आभार

थँक्यू बेटा...! किमोथेरपी सुरु असतानाच राखी सावंतच्या आईने मानले सलमानचे आभार

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान खान व सोहेल खान यांच्यामुळेच राखीला ‘बिग बॉस 14’मध्ये जाण्याची संधी मिळाली होती.

राखी सावंतची आई कॅन्सरशी झुंज देतेय. सध्या तिच्या आईवर किमोथेरपी सुरु आहे. काल राखीने आईचे फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून सगळ्यांना धक्का बसला होता. आता राखीने आईचा एक व्हिडीओ श्ेअर केला आहे. यात राखीची आई सलमान खानचे आभार मानताना दिसतेय.
‘सलमानजी, थँक्यू बेटा. सोहलजी थँक्यू. सध्या किमो सुरु आहे. मी हॉस्पीटलमध्ये आहे. आज चौथा किमो झाला, आणखी दोन बाकी आहेत. यानंतर आॅपरेशन होईल. तुम्हाला परमेश्वर खूप यश देवो, तुम्हाला आनंद देवो,’असे राखीची आई या व्हिडीओत म्हटलेय.

राखी सावंतर नुकत्याच संपलेल्या ‘बिग बॉस’च्या  14 व्या सीझनच्या फिनालेपर्यंत पोहोचली होती. अखेरच्याक्षणी 14 लाख घेऊन राखीने शो सोडला होता.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आईची अवस्था पाहून राखीला धक्का बसला होता. आईचे फोटो शेअर करत, तिने तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.

सलमान खान व सोहेल खान यांच्यामुळेच राखीला ‘बिग बॉस 14’मध्ये जाण्याची संधी मिळाली होती. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राखीने स्वत: याबद्दल सांगितले होते. सोहेल भाईने माझी खूप मदत केली. मी त्यांना मॅसेज केला होता. मला इंडस्ट्रीत काम करायचे आहे. मला ‘बिग बॉस’मध्ये जायचे आहे. काम मागण्यात मला काहीही लाज वाटत नाही, असे मी त्यांना म्हणाले होते. कदाचित सोहेलभाईने सलमान भाईपर्यंत माझा मॅसेज पोहोचवला असावा, असे राखी म्हणाली होती.

Web Title: rakhi sawant mother jaya sawant is battling with cancer say thanks to salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.