Rakhi Sawant : 'तो मला मारायला आला अन्...' पतीच्या अटकेनंतर राखी सावंतची पहिलीच प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:36 IST2023-02-07T16:35:57+5:302023-02-07T16:36:48+5:30
ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यात नवीन वादळ.

Rakhi Sawant : 'तो मला मारायला आला अन्...' पतीच्या अटकेनंतर राखी सावंतची पहिलीच प्रतिक्रिया
Rakhi Sawant : 'ड्रामा क्वीन' राखी सावंतने पती आदिल दुर्रानी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पतीने मारहाण केल्याची तक्रार तिने दाखल केली. राखीच्या तक्रारीनंतर आदिल दुर्रानीला पोलिसांनी अटक केली. राखीने आदिलविरोधात मारहाणीचे आरोप केले आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर राखीची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे.
राखी म्हणते, 'आज सकाळीच तो मला मारण्यासाठी घरी आला होता.मी लगेच पोलिसांना फोन केला. त्याचा मला फोनही आला होता दोन मिनिटं भेटायचं आहे असं म्हणाला. मी म्हणलं का आता मला नाही भेटायचं. हाताने अन्न भरवलं म्हणजे पॅचअप नसतं ते दु:ख मी विसरलेले नाही. माझी आई परत येणार नाहीए.आता मी एफआयआर दाखल केली आहे.'
राखीने माध्यमांसमोर सर्वकाही रडत रडतच सांगितलं. आदिलपासून तिला धोका होता म्हणून तिने वेळीच तक्रार केली. आता पोलिस योग्य ती कारवाई करतील. आदिलवर आयपीसी कलम 504, 506, 406, आणि 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आदिलने पैसे आणि दागिने घेतल्याचाही आरोप राखीने केला आहे. तसेच आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलासा राखीने केला आहे.