Rakhi Sawant : “तर सामान्य माणसांना काय न्याय द्याल?” राखी सावंतचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 06:27 PM2023-02-28T18:27:26+5:302023-02-28T18:32:10+5:30

Rakhi Sawant : राखीने नुकतंंच इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन केलं. या लाइव्ह सेशनमध्ये तिने अनेक आरोप केलेत.

Rakhi Sawant slam Alleged Mumbai Police In Husband Adil Khan Case | Rakhi Sawant : “तर सामान्य माणसांना काय न्याय द्याल?” राखी सावंतचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Rakhi Sawant : “तर सामान्य माणसांना काय न्याय द्याल?” राखी सावंतचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

googlenewsNext

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत सध्या न्यायासाठी लढतेय. तिच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. अलीकडे राखीने पती आदिल खान दुर्रानीवर अनेक गंभीर आरोप करत, त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. राखीच्या तक्रारीनंतर ओशिवारा पोलिसांनी आदिलला लगेच अटक केली. सध्या तो तुरूंगात आहे आणि इकडे बाहेर राखी त्याच्यावर रोज नवे आरोप करत आहेत.

आता तिने ओशिवारा पोलिसांवरही आरोप केले आहेत. राखीने नुकतंंच इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन केलं. या लाइव्ह सेशनमध्ये तिने अनेक आरोप केलेत. आदिल तू महिलांना मूर्ख बनवणं साेडून दे. बायकोलाही मूर्ख बनवणं सोडं. मी कुठल्याही स्थितीत तुला तलाक देणार नाही. तू दुसरं लग्न करून दाखवं, मी तुला पुन्हा जेलमध्ये पाठवेन. तू माझ्याशी फक्त निकाह नाही तर कोर्ट मॅरेजही केलं आहेस, असं राखीने व्हिडीओत म्हटलं आहे. 

मुंबई पोलिसांवर केले गंभीर आरोप
या इन्स्टा लाईव्हमध्ये राखीने मुंबई पोलिसांवरही आरोप केले आहेत. आदिलचे फोन ओशिवारा पोलिसांनी शोधले नाहीत. मी त्यांना सांगून सांगून थकले पण त्यांनी त्याची चौकशीही केली नाही. अरे,तुम्ही माझी एक केस निकाली काढली असती? मी दु:खी आहे. त्याने काय जादू केली की तुम्ही त्याच्याविरोधात कोर्टात एकही पुरावा सादर केला नाही? ओशिवारा पोलिस तुम्ही माझ्यासारख्या सेलिब्रिटीला न्याय देऊ शकत नसाल तर सामान्य माणसांना काय न्याय देणार आहात? पण लक्षात ठेवा, खाकी असो वा खादी सगळ्यांना इथेच भोगायचं आहे. तुम्ही काहीच करू शकले नाहीत, त्याच्या बोलण्यावर तुम्ही भाळले. आदिलच्या फोनमध्ये माझे व इतर अनेक मुलींचे अश्लील व्हिडीओ आहेत. ओशिवारा पोलिसांनी त्याचे फोन शोधले नाहीत. पण मला देवावर विश्वास आहे. अल्ला मला तुझ्याशी लढण्याची ताकद देईल. ओशिवारा पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पण म्हैसूर पोलिसांवर माझा विश्वास आहे, असं राखीने म्हटलं आहे.

 राखीने आदिलविरोधात तक्रार केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला आदिलची रवानगी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. आदिलवर म्हैसूरमध्ये इराणी महिलेकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता त्याची म्हैसूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Web Title: Rakhi Sawant slam Alleged Mumbai Police In Husband Adil Khan Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.