मग लोक आम्हाला आम्ही कॉन्ट्रोवर्सी करतो म्हणतात...! ब्लाऊजची दोरी तुटली अन् राखी सावंत भडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 05:30 PM2021-03-28T17:30:00+5:302021-03-28T17:30:07+5:30
Watch Video : ‘बिग बॉस 14’ शो संपला, पण राखी सावंतच्या चर्चा थांबता थांबेनात. सध्या तिचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय.
‘बिग बॉस 14’ शो संपला, पण राखी सावंतच्या चर्चा थांबता थांबेनात. कुठल्या ना कुठल्या कारणावरून राखी सतत चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय. या व्हिडीओ राखी काहीशी संतापलेली दिसतेय. कारण यात तर ब्लाऊजची तुटलेली दोरी. होय, होळी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी राखी तयार झाली आणि परफॉर्मन्सआधीच तिच्या ब्लाऊजची दोरी तुटली. मग काय, राखी चांगलीच भडकली.
व्हिडीओत राखी पिंक कलरनच्या लंहगा-चोलीत दिसतेय आणि डिझायर तिच्या ब्लाऊजची तुटलेली दोरी शिवत आहेत. पण राखीचा पारा मात्र जाम चढलेला आहे.
‘मी अद्याप एकही मूव्ह केलेली नाही आणि माझ्या ब्लाऊजची अवस्था पाहा. आता मी कसे काम करू? कोणत्या प्रकारची दोरी याला लावली गेली होती? आता मी सेफ्टी पिन लावून काम करावे का? मला सांगा आता मी काय करू? आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आम्ही कलाकार आहोत, आपण कपडे व्यवस्थित तयार केले गेले पाहिजेत. मग लोक आम्हालाच, आम्ही उगाच कॉन्ट्रोवर्सी करतो, म्हणून बोलतात. आम्ही स्वत:च आमच्या ब्लाऊजची दोरी तोडू का? माझे संपूर्ण युनिट तिथे माझी वाट पाहत ताटकळत आहे. हे कलाकारांच्या बाबतीत नेहमीच घडते. ही आर्टिस्टची ट्रॅजेडी आहे,’ असे राखी म्हणतेय.
बिग बॉस 14 मधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे. पापाराझींच्या कॅमे-यासमोर मस्ती करताना दिसतेय. इतकेच नाही तर लोकांना बोलवून बोलवून सेल्फी देतेय. गेल्या काही दिवसांत तिचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
बिग बॉस 14 मध्ये राखी सर्वात एंटरटेनिंग कंटेस्टंट होती. एक चॅलेंजर म्हणून तिने घरात एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत जाणारी ती एकमेव चॅलेंजर ठरली. टॉप 5 मध्ये जागा पक्की केल्यानंतर 14 लाख रुपए घेऊन राखीने शो सोडला होता. आता शो संपला आहे आणि राखी आपल्या आईजवळ परतली आहे. राखीची आई कॅन्सरशी लढतेय. तिच्यावर उपचार सुरु आहेत.