राखी सावंतने पहिल्यांदा सांगितले सासऱ्यांच्या विषयी, पतीला घेऊन या गोष्टीची वाटतेय भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:36 PM2019-09-17T12:36:38+5:302019-09-17T12:36:57+5:30
ड्रामा क्वीन राखी सावंतचे लग्न आणि तिचा पती रितेश हे सगळ्यांसाठी मिस्ट्री बनले आहेत. लग्न झाल्यापासून राखी सतत चर्चेत आहे.
ड्रामा क्वीन राखी सावंतचे लग्न आणि तिचा पती रितेश हे सगळ्यांसाठी मिस्ट्री बनले आहेत. लग्न झाल्यापासून राखी सतत चर्चेत आहेत. राखी आणि तिच्या पतीच्या फोटो पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. राखीने एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यात तिने रितेशला घेऊन एक वेगळा खुलासा केला आहे. सलमान खानच्या 'बिग बॉस 13'मध्ये राखी फॅन्सना रितेशचा परिचय करुन देणार आहे.
जनसत्ताच्या रिपोर्टनुसार राखीने सांगितले की, माझं माझ्या पतीवर खूप प्रेम आहे. रितेश खूप स्मार्ट आणि हँडसम आहे. रितेशला कोणाची नजर लागू नये म्हणून राखीने त्याचा फोटो शेअर करत नाही. त्यामुळे राखीने आतापर्यंत रितेशचा फोटो मीडियापासून लपवून ठेवला आहे. राखीचे म्हणणे आहे तो एक बिझनेसमन असल्या कारणाने त्याचा फोटो मला जगासमोर आणायचा नाहीयं. 2020 मध्ये राखी फॅमिली प्लॉनिंग करणार आहे.
रितेश मुलाला घेऊनच सगळ्यांसमोर येईल. राखीने पुढे सांगितले की, तिचे सासु-सासरे खूपच साधे-सरळ आणि काळजी घेणारे आहेत. राखी एकिकडे सांगतेय रितेशला ती 2020च्या आधी मीडियासमोर आणणार नाही तर पोस्टमध्ये म्हणतेय, 'बिग बॉस 13' पतीची झलक पाहायला मिळेल.
राखी सांगते तिचा पती एनआरआय असून तो युकेला राहातो. लग्नानंतर तो लगेच परत गेला. माझ्या व्हिसाची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाली की, मी त्याच्याजवळ जाईल,’ असे राखीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. गेल्या 29 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते. लग्नाची बातमी लपवून ठेवण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये लग्न केले गेले होते.