ड्रेसिंग सेन्स पाहून आम्हीच शरमेने पाणी पाणी झालो, म्हणत राखी सावंत होतेय ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 18:09 IST2021-06-15T18:03:07+5:302021-06-15T18:09:44+5:30
नेहमीप्रमाणे कॉमेडी अंदाजात राखीने चाहत्यांना हसवले असले तरीही दुसरीकडे मात्र प्रचंड ट्रोलही होत आहे. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळेच ती ट्रोल होत आहे.

ड्रेसिंग सेन्स पाहून आम्हीच शरमेने पाणी पाणी झालो, म्हणत राखी सावंत होतेय ट्रोल
कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आयटम गर्ल राखी सावंतच्या प्रत्येक अदावर सारे लट्टू...... ती कधी काय करेल आणि काय बोलेल याचा नेम नाही....नेहमीच आपल्या बोल्ड अवतारात सा-यांना क्लीन बोल्ड करणारी राखी पुन्हा एकदा तिच्या नौटंकीमुळे चर्चेत आली आहे.
बडी बडी बातें करुन नेहमीच लाइमलाइटमध्ये राहण्याचा राखी प्रयत्न करते. पावसाच्या आगमनामुळे राखी इतकी काही खुश झाली की, आनंदाच्या भरात ती नाचु लागली. मीडियाच्या कॅमेरे दिसताच राखीने अशी काही ड्रामेबाजी केली की, पाहणारेही हैराण झाले.
नेहमीप्रमाणे कॉमेडी अंदाजात राखीने चाहत्यांना हसवले असले तरीही दुसरीकडे मात्र प्रचंड ट्रोलही होत आहे. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळेच ती ट्रोल होत आहे. राखीचे कपडे पाहून आम्हीच आमचे डोळे शरमेने खाली केल्याच्या कमेंट्स तिच्या या व्हिडीओवर उमटत आहेत. काहींनी नेहमीप्रमाणे तिची नौटंकी पाहून कौतुकही केले तर काहींना ट्रान्सपरन्ट ड्रेसवरूनही राखीवर टीकेची झोड उठवली आहे.
लॉकडाऊनमध्येही राखी पब्लिसिटीत राहण्यासाठी ना ना गोष्टी करताना दिसायची. त्यामुळे तिचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही प्रश्न पडायचा. सगळं काही बंद असताना इतकं नटून थटून राखी फिरते तरी कुठे ? कधी कॉफी शॉपच्या बाहेर तर कधी जिमच्या बाहेर तर कधी नारळ पाणी पिताना राखी स्पॉट होत असते.
मध्यंतरी चक्क पीपीई किट घालून राखी रस्त्यावर भाजी विकत घेत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावेळी कोरोनापासून कशा रितीने बचाव करायचा याविषयी देखील चाहत्यांना टीप्स देताना दिसली होती.