Bigg Boss 17मध्ये पती आदिल दुर्रानीसोबत राखी सावंत करणार वाइल्ड कार्ड एंट्री?, अभिनेत्रीनं सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:00 IST2023-11-24T12:59:28+5:302023-11-24T13:00:09+5:30
Bigg Boss 17: राखी सावंत बिग बॉस १७ मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून प्रवेश करणार आहे, अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे.

Bigg Boss 17मध्ये पती आदिल दुर्रानीसोबत राखी सावंत करणार वाइल्ड कार्ड एंट्री?, अभिनेत्रीनं सोडलं मौन
सलमान खान(Salman Khan)चा सर्वात वादग्रस्त शो बिग बॉसचा १७ (Bigg Boss 17)वा सीझनही चर्चेत आहे. या शोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच निर्माते देखील बिग बॉस १७ मध्ये सतत नवीन ट्विस्ट आणत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांचे देखील पूर्ण मनोरंजन होत आहे. नुकतेच नवीद सोलेला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले. आता, हा रिएलिटी शो अधिक मनोरंजक बनवण्यासाठी, निर्माते अनेक स्पर्धकांना शोमधून काढून टाकण्याचा आणि अनेक वाईल्ड कार्ड एंट्री करण्याचा विचार करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस १७ मध्ये एकूण ८ नवीन स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश करू शकतात. वाइल्ड कार्ड एंट्रीमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेले एक नाव म्हणजे राखी सावंत. तिच्यासोबत अभिनेत्रीचा विभक्त पती आदिल दुर्रानीही शोमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. आता राखी सावंतने बिग बॉसच्या सीझन १७ मध्ये एंट्रीच्या बातमीवर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
राखी सावंत म्हणाली...
राखी सावंत बिग बॉसच्या प्रत्येक सीझनला मनोरंजनाचा टच देत असते. त्यामुळे या सीझनमध्येही तिच्या एंट्रीची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. अशी अफवा आहे की बिग बॉस १७ मध्ये, निर्माते राखी सावंत आणि तिचा माजी पती आदिल दुर्रानी यांना देखील शोमध्ये आमंत्रित करू शकतात. विशेष म्हणजे आदिल आणि राखीने जाहीरपणे एकमेकांवर अनेक आरोप केले आहेत. आता राखी सावंतने बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली असून हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.
राखी सावंत सध्या आहे दुबईत
राखी सावंतने सांगितले की, ती सध्या दुबईत आहे. राखी सावंत आणि आदिल बिग बॉसमध्ये आल्याची बातमी पोस्ट करणाऱ्या पापाराझींच्या कमेंट्स बॉक्समध्ये राखी सावंतने लिहिले की, मी दुबईमध्ये आहे. माझ्याकडे वेळ नाही, मी खूप व्यस्त आहे. त्यामुळे या सर्व खोट्या बातम्या आहेत. कृपया माझ्या नावाने कोणालाही प्रसिद्धी देऊ नका, अशा लोकांची लाज वाटते. यानंतर राखीने आणखी एका कमेंटमध्ये लिहिले, चुकीची बातमी, एकदम चुकीची बातमी, आदिल माझ्या नावाने प्रसिद्धी घेत आहे. या सर्व चुकीच्या बातम्या आहेत.