पोलंडमध्ये राहतो राखी सावंतचा नवरा रितेश, भाऊ राकेशने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:05 PM2021-02-02T16:05:14+5:302021-02-02T16:05:43+5:30
राखी सावंतचे लग्न पब्लिसिटी स्टंट असल्याचा दावा नुकत्याच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
राखी सावंत बिग बॉसच्या घरात सर्वांना एण्टरटेन करते आहे, पण तिचा नवरा रितेश अद्याप जगासाठी एक रहस्य आहे. राखी सांगते की ती विवाहित आहे. तिचे रितेशसोबत लग्न झाले आहे पण तिच्याकडे रितेशसोबत कोणताच फोटो नाही आणि त्याला अजून कुणीच पाहिलेले नाही.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतने एका मुलाखतीत सांगितले की, मी पुन्हा एकदा आणि शेवटचे स्पष्ट करू इच्छितो की माझी बहिण राखी सावंत विवाहित आहे आणि माझे जीजू राकेश कल्पनात्मक पात्र नाही. ते खऱ्या जीवनात आहेत आणि पोलंडमध्ये राहतात.
राकेशने पुढे सांगितले की, जेव्हा लग्न झाले होते तेव्हा कुटुंबातील लोक उपस्थित होते. माझे मामा आणि मामीदेखील लग्नाला गेले होते. राखीला लग्नाच्याबाबतीत कोणतेच खोटे बोलण्याची गरज नाही. जेव्हा तिने लग्ने केले नव्हते तेव्हा तिने कधीच विवाहित असल्याचे नाटक केले नव्हते. मग आता जेव्हा तिचे लग्न झाले आहे तेव्हा तिने सर्व जगाला सांगितले आहे.
रितेश कोणत्या गोष्टीमुळे जगासमोर येऊ शकत नाही, याबद्दल विचारले असता राकेश म्हणाला की, ही रितेश जीजूंची पर्सनल चॉइस आहे. या संपूर्ण काळात त्यांना त्याची ओळख जगाला करून नाही द्यायची आहे कारण ते खूप प्राइव्हेट पर्सन आहेत. रितेशला बिग बॉसच्या निर्मात्यांनी अप्रोच केले आणि ते खरेच भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची आई आजारी आहे आणि पोलंडमध्ये कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. मला आशा आहे की रितेश जीजू बिग बॉस १४मध्ये दिसतील.
बिग बॉस १४च्या घरात जेव्हा मीडियाने राखीला तिचा नवरा राकेशबद्दल विचारले होते. तेव्हा राखीने सांगितले की, मी विवाहित आहे. माझे लग्न झाले आहे. मी माझ्या नवऱ्याची वाट पाहते आहे. आधी तो माझ्या समोर आला तरच मी सगळ्यांसमोर घेऊन येऊ शकते. माझ्या जीवनात काही अडचणी होत्या ज्यामुळे मला अर्जंट लग्न करावे लागले. भारतात एक शक्तीशाली माणूस आहे ज्याचे नाव मी घेऊ शकत नाही. जर मी लग्न केले नसते, तर तो मला घेऊन गेला असता. त्याने मला धमकी दिली होती पण मी पोलीस तक्रार केली नव्हती.