जुन्या मालिकांच्या निमित्ताने ‘नवा’ वाद, नफ्यावरून घमासान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 05:34 PM2020-04-23T17:34:45+5:302020-04-23T17:36:27+5:30

वाचा काय आहे प्रकरण

ramayan mahabharat and other old show re-released doordarshan actors demand royalties here is what producers have to say-ram | जुन्या मालिकांच्या निमित्ताने ‘नवा’ वाद, नफ्यावरून घमासान!!

जुन्या मालिकांच्या निमित्ताने ‘नवा’ वाद, नफ्यावरून घमासान!!

googlenewsNext
ठळक मुद्देटीव्हीची सर्वाधिक लोकप्रिय मालिका शक्तिमानमध्ये मुख्य भूमिका साकारणारे आणि ही मालिका प्रोड्यूस करणारे मुकेश खन्ना यांनी यानिमित्ताने वेगळाच सूर आळवला आहे.

लॉकडाऊनदरम्यान दूरदर्शनवर 90च्या दशकातील अनेक लोकप्रिय मालिका पुन्हा परतल्या. रामायण, महाभारतापासून तर शक्तिमान, चाणक्य, बुनियाद अशा एक ना अनेक गाजलेल्या मालिकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. केवळ इतकेच नाही या मालिकांमुळे दूरदर्शनने टीआरपीचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. आता या मालिकांमधील काही कलाकार रॉयल्टीची मागणी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या मागणीने डोके वर काढतात कलाकार व निर्मात्यांमध्ये घमासान सुरु झाल्याचेही चित्र आहे.
होय, अभिनेत्री पल्लवी जोशी हिने रॉयल्टीची मागणी केली आहे. बुनियाद या मालिकेत पल्लवीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. डेक्कन हेरॉल्डला दिलेल्या मुलाखतीत तिने रॉयल्टीचा मुद्दा उपस्थित केला. जुन्या मालिका पुन्हा टेलिकास्ट करून निर्माते नफा मिळवणार असतील तर या मालिकेतील कलाकार व तंत्रज्ञांनाही नफ्यातील वाटा मिळायला हवा, असे तिने म्हटलेय.

काय म्हणाली पल्लवी
जुन्या मालिका पुन्हा प्रसरित करण्यात ना चॅनल कष्ट घेतेय, ना निर्माता. अशास्थितीत त्यांना नफा मिळत असेल तर त्यातील काही भाग त्यांनी या मालिकेतील कलाकार आणि टेक्निशीयन्सला द्यायला हवा. विशेषत: अशावेळी जेव्हा इंडस्ट्रीतील काही लोक आपल्या मुलांच्या दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत आहेत, असे पल्लवी म्हणाली. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, रामायणात सीतेची भूमिका साकारणा-या दीपिका चिखलिया हिनेही काहीसे असेच मत व्यक्त केले आहे.

निर्माते म्हणतात, कुठलाही नफा नाही
रॉयल्टीचा मुद्दा उपस्थित होताच काही निर्माता-दिग्दर्शकांनी याला कडाडून विरोध केला आहे. चाणक्य या मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी निर्मात्यांची बाजू उचलून धरली. माझ्या माहितीनुसार, निर्मात्यांनी कुठल्याही पैशांची डिमांड केलेली नाही. सर्वांनी अगदी एकही पैसा न घेता आपले शो पुन्हा प्रसारित करण्याची परवानगी दिली आहे.  रॉयल्टी कॉन्सेप्टला माझा विरोध नाही. पण हा मुद्दा उखरून काढण्याची ही योग्य वेळ नाही. तसेही पहिल्यांदा कुठली मालिका रिटेलिकास्ट केली गेलेली नाही. याआधीही असे झालेय, असे द्विवेदी म्हणाले.

त्यांना रॉयल्टी का द्यावी?

टीव्हीची सर्वाधिक लोकप्रिय मालिका शक्तिमानमध्ये मुख्य भूमिका साकारणारे आणि ही मालिका प्रोड्यूस करणारे मुकेश खन्ना यांनी यानिमित्ताने वेगळाच सूर आळवला आहे. रॉयल्टीची मागणी करणे गैर आहे. काही गोष्टी करारबद्ध असतात आणि कलाकारांना त्या मानाव्याच लागतील. निर्माता प्रत्येक पद्धतीने पैसा रिकव्हर करू शकतात. निर्माता या नात्याने मी प्रत्येक त-हेने पैसा कमवेल. जुन्या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार आजही चांगले काम करत आहेत. त्यांचे मोठे नाव आहे. मग त्यांना रॉयल्टी का द्यावी? असा सवाल यानिमित्ताने मुकेश खन्ना यांनी केला आहे.

Web Title: ramayan mahabharat and other old show re-released doordarshan actors demand royalties here is what producers have to say-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.