रामायण : शूटिंगदरम्यान नदीच्या मध्यभागी अडकले होते राम-सीता आणि लक्ष्मण, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 07:55 PM2020-05-18T19:55:25+5:302020-05-18T19:56:02+5:30
रामायणातील लक्ष्मण म्हणजेच अभिनेते सुनील लहरी यांनी सांगितले की, रामानंद सागर यांनी शूटिंगदरम्यान कट बोलत नाही तोपर्यंत नदीत होडी चालवत रहायला सांगितले होते. त्यांचा आवाज न आल्यामुळे आम्ही खूप पुढे निघून गेलो होतो.
रामानंद सागर दिग्दर्शित रामायण दूरदर्शननंतर पुन्हा एकदा स्टार प्लसवर प्रसारीत होते आहे. या मालिकेत लक्ष्मणच्या भूमिकेत पहायला मिळालेले अभिनेते सुनील लहरी सध्या ट्विटरवर या मालिकेच्या संदर्भातील किस्से चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. असाच एक इंटरेस्टिंग किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
सुनील लहरी यांनी व्हिडिओमध्ये पहिला किस्सा नदीचा शेअर केला आहे. ज्यात ते दिग्दर्शकाचा आवाज ऐकू न आल्यामुळे होडीतून खूप पुढे निघून गेले. दुसरा किस्सा आहे की सीनदरम्यान आर्य सुमंत यांचे धोतर फाटते.
सुनील यांनी सांगितले की, मी, सीता व राम नदीत होडीमध्ये बसलेलो होतो. मला रामानंद सागर यांनी सांगितले होते की मी जोपर्यंत कट बोलत नाही तोपर्यंत मला होडी चालवत रहायचे आहे. मी चालवत गेलो. थोड्या वेळाने पाहिले तर खूप उशीर झाला होता.
Ramayan 13 shooting Ke Piche Ki Kuch Ankahi chatpati baten pic.twitter.com/fqOwj7ENjV
— Sunil lahri (@LahriSunil) May 18, 2020
मग मी मागे वळून पाहिले तर समजले की रामानंद जींनी कधीच कट बोलले होते पण मी ऐकले नाही. तोपर्यंत अर्धे युनिट निघून गेले होते. आम्ही लोक नदीत अडकलो होतो. आम्ही लोकांना आवाजही दिला. मग दोन जण आली. यादरम्यान मी विचार केला ही यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. मी माझा विग काढला आणि नदीत उडी मारली. नदीत अर्धा तास पोहण्याचा आनंद घेतला.
Ramayan 12 shooting Ke Piche ki Kuchh Ankahi chatpati baten pic.twitter.com/3GnxpYoBsk
— Sunil lahri (@LahriSunil) May 17, 2020
त्यांनी आणखीन एक किस्सा सांगितला.
Pic from the set of Ramayan with Sagar Sahab son Subhash Sagar and grandson Jyoti Sagar pic.twitter.com/Lg4TowfSDR
— Sunil lahri (@LahriSunil) May 15, 2020
ते म्हणाले की, एका सीनमध्ये निशाद राज व आर्य सुमंत बसून सीरियस गोष्ट बोलत होते. खूप इंटेस सीन होता. त्यावेळी खाली बसताना निशाद राजचे धोतर फाटले होते. सेटवरील गंभीर वातावरण अचानक सगळेच हसू लागले.