रामायणमधील लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसलेल्या सुनील लहरींचा मुलगा आहे इतका हँडसम, सोशल मीडियावर आहे त्याचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 08:00 IST2020-05-12T08:00:00+5:302020-05-12T08:00:02+5:30
सुनील लहरी यांचा मुलगा क्रिशचे हे फोटो पाहिल्यानंतर आता सोशल मीडियावर नेटिझन्स त्याला मोठ्या प्रमाणावर फॉलो करत आहेत.

रामायणमधील लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसलेल्या सुनील लहरींचा मुलगा आहे इतका हँडसम, सोशल मीडियावर आहे त्याचीच चर्चा
लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना त्यांची आवडती रामायण ही मालिका नुकतीच पाहायला मिळाली. ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत असून या मालिकेत काम करणारे कलाकारही तितकेच चर्चेत आहेत. राम, रावण, सीता, लक्ष्मण, भरत, कैकयी, दशरथ अशा अनेक लहान-मोठ्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा शोध लोक सोशल मीडियाद्वारे करत आहेत. अशात रामायण मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यासोबतच त्याचा मुलगा देखील सोशल मीडियावर हिट झाला आहे.
रामायण या मालिकेत लक्ष्मणच्या भूमिकेत आपल्याला सुनील लहरी यांना पाहायला मिळाले होते. त्यांच्या मुलाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव क्रिश असून तो त्याचे वडील सुनील लहरी यांच्याइतकाच हँडसम आहे.
सुनील लहरी यांच्या फॅनपेजवर त्यांचा एक जुना फोटो आणि त्यांच्या मुलाचा आताचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यावरून सुनील तरुणपणात जितके सुंदर दिसायचे, तितकाच त्यांचा मुलगा देखील सुंदर दिसतो अशा कमेंट सुनील यांचे चाहते त्या फोटोवर देत आहेत.
सुनील लहरी यांचा मुलगा क्रिशचा हा फोटो पाहिल्यानंतर आता सोशल मीडियावर नेटिझन्स त्याला मोठ्या प्रमाणावर फॉलो करत आहेत. अनेक मुली त्याच्या लूक्सचे भरभरून कौतुक करत आहेत.
क्रिश हा देखील एक अभिनेता आहे. पण त्याला त्याच्या वडिलांसारखी लोकप्रियता अद्याप मिळालेली नाहीये. त्याने पीओडब्ल्यू- बंदी युद्ध के या मालिकेत काम केले होते.
सुनील लहरी यांचा हा जुना फोटो काही आठवड्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनी हा फोटो पोस्ट करत नववर्षाच्या शुभेच्छा त्यांच्या चाहत्यांना दिल्या होत्या. रामायण ही मालिका पुन्हा सुरू झाल्यानंतर अनेकांनी हा फोटो शेअर केला होता. सुनील लहरी यांनी रामायणासोबतच विक्रम वेताळ, परम वीर चक्र अशा मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तसेच ते काही चित्रपटांमध्ये देखील झळकले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत.