रणबीर कपूरची जबरा फॅन आहे ही टीव्ही अभिनेत्री, तासनतास रणबीरच्या घराबाहेर वाट पाहिली, मात्र....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 10:34 AM2017-12-16T10:34:31+5:302017-12-16T16:04:31+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे देशातच नाही तर जगभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी मुंबईतील ...
ह ंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे देशातच नाही तर जगभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी मुंबईतील या कलाकारांच्या बाहेर फॅन्सची मोठी गर्दी कायमच पाहायला मिळते. सर्वसामान्यांना सेलिब्रिटींबद्दल असलेले आकर्षण आणि क्रेझ आपण समजू शकतो. मात्र एका कलाकारावर दुस-या कलाकाराची जादू झाली आहे आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याने तासनतास घालवलेत असं तुम्ही कधीच ऐकलं नसेल.मात्र अशी एक घटना नुकतीच समोर आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा बर्फी म्हणजेच अभिनेता रणबीर कपूर यांचे सिनेमा सध्या रुपेरी पडद्यावर फ्लॉप ठरत आहे. मात्र रणबीरच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही कमतरता आलेली नाही. त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये बिल्कुल कमी झालेली नाही.सिनेमा फ्लॉप ठरत असले तरी रणबीरसाठी रसिकांच्या मनातील क्रेझ कायम आहे.सामान्य रसिकांसह टीव्हीच्या दुनियेतील कलाकारसुद्धा रणबीरचे डायहार्ट फॅन आहेत. छोट्या पडद्यावरील मालिका दिल ढूँढता है या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री शिव्या पठानिया सुरुवातीपासूनच रणबीरची फॅन आहे. नुकतंच एका मुलाखती दरम्यान तिच्या रणबीरवरील प्रेमाची पोलखोल झाली आहे. शिव्याची एक झलक पाहण्यासाठी तिचा एक फॅन तिच्या घराबाहेर तासनतास उभा होता. या घटनेमुळे शिव्याची एक जुनी आठवण ताजी झाली. अभिनेता रणबीर कपूरची डायहार्ट फॅन असल्याने त्याची एक झलक पाहता यावी यासाठी त्याच्या घराबाहेर तासनतास प्रतीक्षा केली होती अशी कबुली तिने या मुलाखती दरम्यान दिली. माझ्या फॅनला माझी झलक पाहता आली. मात्र तासनतास थांबूनही रणबीरचं दर्शन न झाल्याने कमनशिबी ठरल्याची खंतही तिने बोलून दाखवली. इतका वेळ वाट पाहूनही रणबीरला पाहता आलं नसल्याने त्यावेळी प्रचंड निराश झाल्याचं तिने सांगितले. शिव्याने विविध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. एक रिश्ता साझेदारी का या मालिकेतही तिने काम केले आहे. या मालिकेत किंशुक वैद्यसह तिने काम केले आहे. किंशुकसोबतच्या ऑफस्क्रीन रोमान्समुळे शिव्या चर्चेत राहिली आहे.