'रंग माझा वेगळा'मध्ये मोठा बदल, मालिकेने घेतले लीप; कथानक सरकरणार १४ वर्षांनी पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 04:36 PM2023-02-28T16:36:46+5:302023-02-28T16:50:20+5:30

रंग माझा वेगळा मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्टमुळे कथानक बदललं असून मालिका रंजक वळणावर आली आहे.

Rang Majha Vegla serial episodic, the plot will move forward 14 years | 'रंग माझा वेगळा'मध्ये मोठा बदल, मालिकेने घेतले लीप; कथानक सरकरणार १४ वर्षांनी पुढे

'रंग माझा वेगळा'मध्ये मोठा बदल, मालिकेने घेतले लीप; कथानक सरकरणार १४ वर्षांनी पुढे

googlenewsNext

रंग माझा वेगळा मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्टमुळे कथानक बदललं असून मालिका रंजक वळणावर आली आहे.
 दीपाची मैत्रीण साक्षीच्या ऑपरेशन दरम्यान कार्तिकने मुद्दाम तिचा जीव घेतला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, यामुळेच त्याला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर दीपा कार्तिक विरुद्ध साक्ष देताना दिसतेय. दीपाच्या साक्षीवरुन कार्तिकला कोर्ट खूनचा आरोपी ठरवतो. त्यानंतर त्याला चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होते. 

आता मालिकेत नात्यांचे बदलते रंग पाहायला मिळणार आहेत. मालिकेत लीप येणार असून कथानक १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. सध्या मालिकेत कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. न्यायालयाच्या निर्णयासमोर दीपाही हतबल झालीय. काही दिवसांपूर्वीच दोघांमधील गैरसमज दूर होऊन त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली होती. मात्र दीपा-कार्तिकचा आनंद नियतीला मान्य नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा दोघंही एकमेकांपासून दुरावलेत. दुराव्याच्या याच वळणावर मालिकेचं कथानकही १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे.

 

या १४ वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. दीपिका-कार्तिकी मोठ्या

झाल्या आहेत. १४ वर्षांची शिक्षा भोगून कार्तिकची सुटका होईल. मात्र आता दीपाचा वनवास सुरु होणार आहे. यामागे नेमकं काय कारण असेल? कार्तिकने दीपाला माफ केलं का? काय असेल या दोघांच्या नात्याचं भवितव्य? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.  

Web Title: Rang Majha Vegla serial episodic, the plot will move forward 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.