TRPच्या शर्यतीत कोणी मारली बाजी? ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘हा’ शो ठरला नंबर 1
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:40 IST2022-04-15T17:38:52+5:302022-04-15T17:40:10+5:30
TRP Report : नंबर वन मालिका बनण्यासाठी मालिकांमध्ये चढाओढ सुरू असते. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहायचं तर मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आणले जातात.

TRPच्या शर्यतीत कोणी मारली बाजी? ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘हा’ शो ठरला नंबर 1
Marathi Serials TRP Report : नंबर वन मालिका बनण्यासाठी मालिकांमध्ये चढाओढ सुरू असते. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहायचं तर मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आणले जातात. काही फसतात तर काही ट्विस्ट प्रेक्षकांना मनापासून आवडतात. सध्या अनेक मराठी मालिका चर्चेत आहेत. यापैकी कोणती मालिका नंबर 1 वर आहे, टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या मालिकांनी बाजी मारलीये, हे जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दर आठवड्याला प्रेक्षकांचा कल बदलंत जातोय. त्यानुसार, कोणत्या मालिकेने प्रेक्षकांचं सर्वात जास्त मनोरंजन करून पहिल्या स्थानावर बाजी मारली हे आपण जाणून घेऊया.
सुरूवात करू या टॉप 10 पासून. तर सध्या दहाव्या स्थानावर आहे ती स्टार प्रवाह वाहिनीवरची ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका. ‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ ही मालिका सध्या नवव्या स्थानावर आली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आठवा क्रमांक पटकावला आहे तर स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. तर‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सहाव्या स्थानावर आहे.
टॉप 5
आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाºया कीर्तीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र अखेर जिजी अक्कानी होकार दिल्यानंतर किर्तीच्या आयुष्याला आता नवी कलाटणी मिळणार आहे. ही मालिका कोणती तुम्ही ओळखलं असेलंच. मालिकेचं नाव आहे, ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका टीआरपी चार्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका चौथ्या स्थानावर आहे.
अरूंधती आणि अनिरूद्धची ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. तर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर काय आहे तर स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा. होय, या सोहळ्यानं यावेळी अव्वल स्थान पटकावलं आहे.