'प्रितीचा वणवा..'मध्ये अनघा भगरेची एन्ट्री; सावी-अर्जुनच्या नात्याला पुन्हा मिळणार कलाटणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 18:40 IST2024-01-10T18:38:21+5:302024-01-10T18:40:10+5:30
Angha bhagare: रंग माझा वेगळा ही मालिका संपून अवघे काही महिने झाले असतानाच अनघाला नवीन मालिका मिळाली आहे.

'प्रितीचा वणवा..'मध्ये अनघा भगरेची एन्ट्री; सावी-अर्जुनच्या नात्याला पुन्हा मिळणार कलाटणी?
छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा'. ही मालिका संपून आता बरेच महिने झाले आहेत. मात्र, तरीदेखील या मालिकेतील कलाकारांची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. ही कलाकार मंडळी या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत येत असतात. यामध्येच या मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुल (angha bhagare) सध्या चर्चेत येत आहे. या मालिकेनंतर अनघाच्या पदरात एक नवी मालिका पडली आहे.
काही महिन्यांपूर्वीच अनघाने स्वत:चं हॉटेल सुरु केलं. त्यामुळे ती नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत होती. हॉटेल सुरु केल्यानंतर अनघा इंडस्ट्री सोडणार की काय? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. परंतु, असं अजिबात नसून अनघा लवकरच कलर्स मराठीवरील एका गाजलेल्या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
अनघा लवकरच प्रितीचा वणवा उरी पेटला या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अनघाची झलक दाखवण्यात आली आहे. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अर्जुन जेवायला एका उपाहारगृहात जातो. यावेळी तो जेवणात काय आहे? असं विचारतो. त्याच्या या प्रश्नावर हॉटेलची मालकीन त्याला सगळं काही संपलंय असं सांगते. विशेष म्हणजे यात हॉटेलच्या मालकिनीच्या भूमिकेत अनघा झळकली आहे.
दरम्यान, आता अनघाचा या मालिकेत नेमका काय रोल आहे? तिच्या येण्यामुळे अर्जुन-सावीमधलं अंतर वाढेल की कमी होईल? हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.