'रंग माझा वेगळा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 13:38 IST2024-04-24T13:37:40+5:302024-04-24T13:38:43+5:30
रंग माझा वेगळा मालिकेत झळकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

'रंग माझा वेगळा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन
गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. प्रथमेश परब, तितिक्षा तावडे, गौतमी देशपांडे, शिवानी सोनार असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. अशातच मराठीटेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली साळुंखेने साखरपुडा केलाय. सोनालीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोनाली साळुंखेने महाराष्ट्रातील धुळे शहरात साखरपुडा केलाय. सोनालीने हातातली साखरपुड्याची अंगठी दाखवत साखरपुड्याचा फोटो सर्वांसोबत शेअर केलाय. सोनालीच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध नाही. सोनाली गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. तिने 'रंग माझा वेगळा', 'गाथा नवनाथांची', 'विघ्नहर्ता गणेश' अशा मालिकांमध्ये अभिनय केलाय.
सोनाली सध्या सोनी मराठीवरील 'छोट्या बयोची मोठी स्वप्न' मालिकेत अभिनय करत आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबरने साखरपुड्याबद्दल सोनालीचं अभिनंदन केलंय. सोनाली मनोरंजन विश्वात मालिकांमधून विविध भूमिका साकारुन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. साखरपुड्याबद्दल अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी सोनालीचं अभिनंदन केलंय.