'रंग माझा वेगळा' मालिका संपताच श्वेताचा झाला मेकओव्हर, आता दिसतेय आणखी ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 13:26 IST2023-09-30T13:20:38+5:302023-09-30T13:26:35+5:30
मालिका संपल्यानंतर अनघाने आपला लूक चेंज केल्याचं दिसतंय.

'रंग माझा वेगळा' मालिका संपताच श्वेताचा झाला मेकओव्हर, आता दिसतेय आणखी ग्लॅमरस
स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या मालिकेत नकारात्मक श्वेताची भूमिका साकारुन अनघा भगरे घराघरात पोहचली. मालिका संपली तरी यातील कलाकारांवर प्रेक्षक अजूनही तितकचं प्रेम करतात. अनघा भगरे हिची ही पहिलीच मालिका होती आणि तिने या मालिकेतून आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. अनघा भगरेचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे.
अनघाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय. मालिका संपल्यानंतर अनघाने हेअर कट करत तिचा लूक चेंज केल्याचं दिसतेय. अनघाच्या चाहत्यांनी ही तिचा हा नवा हेअर कट आवडल्याचं दिसतेय. ब्युटीफुल, गॉर्जिअस, स्वीट स्माईल अशा कमेंट्स तिच्या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत.
मालिका संपल्यावर श्वेताने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत 'वदनी कवळ' असे तिच्या हॉटलचे नाव आहे. याची माहिती अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची कन्या आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी झी मराठी वाहिनीवरील 'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे. अनघाचा जन्म 24 जून 19994 रोजी नाशिकमध्ये झाला. तिला लहानपणापासून अभिनयाची तसेच मॉडलिंगची आवड होती. तिने अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. शिवाय, अनघाने प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये मॅनेजर म्हणून काम केले आहे.