स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केले सेटवरील शेवटचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:14 PM2023-08-29T17:14:39+5:302023-08-29T17:16:28+5:30

‘रंग माझा वेगळा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  

Rang Maza Vegla Today Last Day Shooting actors shared the last pictures from sets | स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केले सेटवरील शेवटचे फोटो

Rang Maza Vegla

googlenewsNext

मालिकाविश्नात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. गेल्या काही दिवसांत टीआरपीमुळे अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.  आता ‘रंग माझा वेगळा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  

३० ऑक्टोबर २०१९ पासून स्टार प्रवाहवर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका प्रसारित झाली.  अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण हळूहळू मालिकेचं कथानक लांबवलं गेलं आणि प्रेक्षक नाराज झाले. मालिकेतील कलाकारांनी त्यांचे शेवटच्या शूटिंगच्या दिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

मालिकेत भूमिका साकरणारी दीपा म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेनं इन्स्टाग्राम शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर केले आहेत. 

 

View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

तर मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुलनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. 

 

View this post on Instagram

A post shared by Anaghaa {Bhagare} (@anaghaa_atul)

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. काही काळ टिआरपीवर देखील या मालिकेने वर्चस्व गाजवलं. मालिकेतील  दीपा, कार्तिक, सौंदर्या इनामदार, आयेश, श्वेता ही पात्र प्रेक्षकांची आवडती राहिली. 

 आता ‘रंग माझा वेगळा’  या मालिकेची जागा तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका घेणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून ही मालिका 'ये है मोहेब्बतें' या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

 

Web Title: Rang Maza Vegla Today Last Day Shooting actors shared the last pictures from sets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.